येत्या आठवड्यात 'या' शेअर्सवर ठेवा नजर, मिळू शकतो तगडा परतावा

share market
share marketshare market

IIFL सिक्युरिटीजचे डायरेक्टर संजीव भसीन यांचा शेअर मार्केटचा अनुभव दांडगा आहे. संजीव भसीन मागच्या 32 वर्षापासून शेअर मार्केटशी जोडले आहेत. शेअर बाजारात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. IIFL सिक्युरिटीजचे क्लायंट्स वर्षानुवर्षे त्यांच्या सुचवलेल्या शेअर्सवर फायदा कमावत आहेत. संजीव भसीन प्रेक्षकांसाठी आठवड्यात तीन वेळा सीएनबीसी-आवाजवर कमाईचे टॉप कन्विक्शन पिक्स सादर करतात.

share market
कोरोना काळात पर्सनल फायनान्स कसे हाताळावे? जाणून घ्या

संजीव भसीन यांची नजर कोणत्या स्टॉक्सवर आहे ते जाणून घेऊया.

येत्या बुधवारपर्यंत निफ्टी 16000 पर्यंत पोहोचू शकतो असे संजीव भसीन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मजबूत स्टॉक्स निवडले पाहिजेत. 2021 या वर्षात रिअल इस्टेट सेक्टर स्टार परफॉर्मर असेल. गोदरेज प्रॉपर्टी 2 वर्षात 2500 रुपयांपर्यंत पोहोचेल, याचा अर्थ गोदरेज प्रॉपर्टीचे शेअर्स आताच्या दरांपेक्षा दुप्पट होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनबीसीसीमध्ये मजबूत बाऊन्स होईल असेही ते म्हणाले.

सोन्याचा दर 50 हजार पार करेल?

सोन्याचा दर 50 हजार पार करेल आणि सेंसेक्स 53 हजारांचा पल्ला गाठेल असेही संजीव भसीन यांनी म्हटले आहे. येत्या 3 वर्षात रिअल इस्टेट सेक्टरमध्येही जोरदार बूम बघायला मिळेल. हीरो मोटो, गोदरेज कंझ्युमर आणि बालकृष्ण इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने चांगले परफॉर्म केल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यांनी सांगितल्यानंतर ज्यांनी हे 3 स्टॉक्स घेतले त्यांना तगडा फायदा झाला.

share market
IPO अलर्ट : येत्या 7 जुलैला येतोय 'या' कंपनीचा IPO; जाणून घ्या सर्व माहिती

बाटा इंडिया स्टॉक्स खरेदी करा

संजीव भसीन यांनी गुंवणूकदारांना बाटा इंडियाचे ( Bata India) स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फुटवेअर आणि त्याच्याशी संबंधित कंझ्युमेबल प्रॉडक्टमध्ये तेजी बघायला मिळेल असा अंदाज संजीव भसीन यांनी वर्तवला आहे. हे स्टॉक 1595 ते 1605 रुपयांच्या दरम्यान असतील तेव्हा खरेदी करायचे. यात 1675 रुपयांचे लक्ष्य बघायला मिळेल. सोबतच सुरक्षित गुंतवणुकिसाठी 1570 रुपयांवर स्टॉपलॉस लावायला विसरू नका अशी आठवण संजीव भसीन यांनी केली आहे.

बंधन बँक खेरदी करा

संजीव भसीन यांनी दुसरा स्टॉक जो निवडला आहे तो म्हणजे Bandhan Bank. ग्रामीण उत्पन्नात वाढ झाल्याने छोट्या सावकार बँकांना याचा चांगला फायदा होईल. हे स्टॉक्स 324 से 324.50 च्या किंमतीवर खरेदी केले पाहिजेत असेही ते म्हणाले. यात 343 रुपयांचे लक्ष्य बघायला मिळेल. सोबतच सुरक्षित गुंतवणुकिसाठी 318 रुपयांवर स्टॉपलॉस लावणे गरजेचे आहे असंही संजीव भसीन यांनी म्हटले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com