महाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक 7 लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर भारती एअरटेलने 35 हजार ग्राहकांची वाढ झाली आहे.

मुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात 'ट्राय'ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इतर ऑपरेटर्सने मात्र घट नोंदविली आहे.

मार्चनंतर पहिल्यांदा सोनं झालं स्वस्त; रुपया घसरला​

सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक 7 लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर भारती एअरटेलने 35 हजार ग्राहकांची वाढ झाली आहे. व्होडाफोन-आयडियाने तब्बल 6.5 लाख वापरकर्त्यांची नकारात्मक घट नोंदविली आहे. तर बीएसएनएल 50000 ग्राहक गमावले आहेत.

घसरणानंतरही व्होडाफोन-आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर जिओ 3.27 कोटी ग्राहक, भारती एअरटेल 1.55 कोटी आणि बीएसएनएल 70 लाख ग्राहक आहेत.

Petrol Price Today - सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त; आजचे दर किती?​

जून 2020 मध्ये असलेल्या 9.33 कोटी सबस्कायबर्समध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून 35,000 ग्राहकांनीही भर पडली असून जूनमध्ये स्बस्क्राइबर्स 9.12 कोटीवर पोहोचले आहेत. जून महिन्यात, केवळ जिओमध्ये मे 2020 च्या तुलनेत 1% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सध्या, व्होडाफोन-आयडियाचा ग्राहकांचा सर्वाधिक वाटा 39.35% आहे आणि 35.87% शेअरसह जिओ दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर भारती एअरटेलचा वाटा सुमारे 17.09% आणि बीएसएनएलचा 7.69 टक्के आहे. जिओने 'वर्क फ्रॉम होम'सारखे किफायतीशीर प्लॅन्स तसेच डबल डेटा ऑफर आणल्यामुळेच त्यांच्या ग्राहकसंख्येत घसघशीत वाढ झाली. नुकतीच जिओने आपली पोस्ट पेड सेवा सुरू केली असून यामध्ये डेटा रोल ओव्हर, इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest data from TRAI shows that Jio add 7 lakh new users