LIC गुंतवणुकदारांना मिळणार चांगला परतावा, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC

LIC गुंतवणुकदारांना मिळणार चांगला परतावा, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सरकार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (LIC)  वाढीचा विचार करत आहे. LIC 17 मे रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. तेव्हापासून कंपनीचा स्टॉक त्याच्या 949 रुपयांच्या किमतीवरून खाली घसरला आहे. कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 872 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला होता. मंगळवारी कंपनीचा शेअर 595.50 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा: जग मंदीच्या दिशेने; 'या' गोष्टी आहेत कारणीभूत

परदेशी ब्रोकरेज कंपन्या एलआयसीच्या स्टॉकबाबत आशावादी आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी पुढील वर्षासाठी कंपनीच्या स्टॉकला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा विचार केला आहे. 14 ऑक्टोबर रोजीच्या सिटी संशोधन अहवालात LIC च्या स्टॉकसाठी रु. 1,000 चे लक्ष्य ठेवले आहे. एलआयसी जागतिक कंपन्यांपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. वित्त मंत्रालय एलआयसी व्यवस्थापनाला गुंतवणूकदारांचे भांडवल वाढवण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने पाऊले उचलू शकते. याबद्दल विचार करत आहे. एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 65 वर्षांहून अधिक जुन्या संस्थेच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्यांच्या उत्पादन किंमतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा: HDFC बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढवले FD चे दर; मिळणार एवढे टक्के रिटर्न

गैर-सहभागी विमा उत्पादनांमध्ये, विमा कंपन्यांना त्यांचा नफा पॉलिसीधारकांना लाभांशाच्या रूपात शेअर करण्याची आवश्यकता नाही. तर भागीदारी उत्पादनांमध्ये, विमा कंपन्यांना लाभांश द्यावा लागतो. एलआयसीचा पहिल्या तिमाहीचा निव्वळ नफा 2.94 कोटी रुपयांवरून 682.88 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. LIC च्या IPO मधून सरकारला 21,000 कोटी रुपये मिळाले. मंगळवारी एलआयसीचा शेअर 0.72 टक्क्यांनी कमी होऊन 595.50 रुपयांवर बंद झाला.