LIC Policy: LIC च्या योजनेत रोज 110 रुपये गुंतवा आणि मिळवा तिप्पट रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC Policy

LIC Policy: LIC च्या योजनेत रोज 110 रुपये गुंतवा आणि मिळवा तिप्पट रिटर्न

LIC Investment Plan : लोकांकडे गुंतवणुकीपासून ते विमा खरेदी करण्यापर्यंत अनेक पर्याय आहेत, परंतु आजही बहुतेक लोक भारतीय आयुर्विमा महामंडळात गुंतवणूक करतात. एलआयसीने ऑफर केलेल्या विम्यामध्ये सुरक्षेसोबतच विम्याचा लाभही दिला जातो. यासोबतच काही पॉलिसी योजनांमध्ये कर बचतीचा पर्यायही आहे.

कोणतीही व्यक्ती एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकते. तुम्हालाही या योजनेत पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्ही एलआयसी रेग्युलर प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता. या विमा योजनेत 21 वर्षांसाठी वार्षिक 40 हजार रुपये जमा करावे लागतील. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तिप्पट रक्कम दिली जाईल.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

ही पद्धतशीर गुंतवणूक विमा योजना म्हणजेच SIIP आहे. LIC च्या SIIP योजनेत, गुंतवणूकदारांना 21 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमची रक्कम जमा केली जाऊ शकते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वार्षिक पद्धतीने प्रीमियम जमा भरला, तर त्याला 40,000 रुपये गुंतवावे लागतील.

सहा महिन्याचा पर्याय निवडल्यावर, 22,000 रुपये प्रीमियम, त्रैमासिक पर्यायासाठी, 12,000 रुपये आणि मासिक पर्याय निवडल्यावर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये वाढीव कालावधीचा पर्यायही देण्यात आला आहे.

हेही वाचा: Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनीचा होणार लिलाव; 'या' कंपन्या घेऊ शकतात ताबा

21 वर्षांसाठी मासिक 4000 रुपये जमा केल्यास, तुमची एकूण गुंतवणूक 10,08,000 रुपये होईल. 21 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर, तुम्हाला गुंतवलेल्या रकमेव्यतिरिक्त सुमारे 35 लाख रुपये मिळतील, जे तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट असेल. SIIP योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना 4,80,000 रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

तुम्ही ही पॉलिसी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही खरेदी करू शकता. ऑफलाइन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही एलआयसी कार्यालयाला भेट देऊ शकता. यासह, ऑनलाइन लाभ घेण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :moneypolicyLICInvestment