LIC: महिलांसाठी खास Scheme! दररोज 29 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणार 4 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC

LIC: महिलांसाठी खास Scheme! दररोज 29 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणार 4 लाख

एलआयसीने महिला आणि मुलींसाठी एक विशेष योजना आणली आहे, ज्याचे नाव एलआयसी आधार शिला (LIC Aadhaar Shila) योजना आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, जीवन विमा योजना आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही रोज 29 रुपये जमा करून 4 लाख रुपये मिळवू शकता.

हेही वाचा: LIC policy : मुलीच्या शिक्षणाची सोय आत्ताच करा; १२१ रुपये भरा आणि २७ लाख मिळवा

एकरकमी पेमेंट सुविधा

एलआयसी आधार शिला (LIC Aadhaar Shila) ही योजना संरक्षणासह बचत देते आणि मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देते. याशिवाय, पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर एकरकमी पेमेंटची सुविधाही मिळते.

बेसिक सम एश्योर्ड किती ?

एलआयसी आधार शिला योजनेअंतर्गत, प्रति व्यक्ती किमान मूळ विमा रक्कम (Basic sum assured)  75,000 रुपये आहे, तर कमाल विमा रक्कम 3 लाख रुपये आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला किमान रक्कम मिळेल. या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी 10 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत असू शकतो. प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

हेही वाचा: LIC policy : ही योजना वृद्धापकाळात देईल आर्थिक आधार; त्वरीत गुंतवणूक करा

मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये कसे मिळवायचे ?

तुम्ही 20 वर्षांसाठी दररोज 29 रुपये जमा केल्यास, एकूण गुंतवणूक एका वर्षात 10,959 रुपये आणि 20 वर्षांत 2,14,696 रुपये होईल. यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी रक्कम गोळा करू शकतात.

एलआयसी आधार शिला स्कीम कोणासाठी ?

- या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा आठ वर्षे आहे.
- जास्तीत जास्त 55 वर्षांची महिला ही पॉलिसी घेऊ शकते.
- पॉलिसीधारकाचे वय मॅचुरीटीवेळी 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- ही पॉलिसी बचतीसह लाइफ कव्हर देते.
- या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम मिळते.
 - पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला मदतीची रक्कम मिळते

हेही वाचा: LIC ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! Lapsed Policies आता पुन्हा सुरू करता येणार, जाणून घ्या माहिती

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Lic Scheme For Women Will Get Best Return Of 4 Lakhs In A Investment Of 29 Rupees Per Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..