
LICच्या बाजार भांडवलात घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटींचा फटका
एलआयसीची शेअर बाजारातील एन्ट्री ही देशातील ऐतिहासिक बाब होती. जेव्हापासून एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आलाय तेव्हापासून सर्वांचे लक्ष एलआयसीच्या छोट्या मोठ्या हालचालींकडे आहे. मात्र एलआयसीचे जेव्हापासून शेअर बाजारात पदार्पण झाले तेव्हापासून त्याच्या मागे घसरणीचे सत्र सुरू आहे.
हेही वाचा: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर, Sensex अन् Nifty घसरली
मागील 14 ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल कमी झाले असून एलआयसी गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी गमावले आहे. आयपीओनुसार अप्पर बँण्डच्या हिशोबाने एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 242 कोटी रुपये होते मात्र आता एलआयसीचे बाजार भांडवल 5 लाख सहा हजार 126 कोटी रुपयांवर आले. म्हणजेच एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: Gold-Silver Price: सोने महागलं तर चांदी स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असून या कंपनीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. ६५ वर्ष जुन्या या कंपनीची मालमत्ता ५०० अब्ज कोटी इतकी आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते.
या कंपनीचे २५ कोटी विमाधारक आहेत. विमा बाजारपेठेतील जवळ जवळ दोन तृतियांश हिस्सा LICचा आहे. देशात २ हजार शाखा आहेत, १ लाख कर्मचारी आणि २८.६० कोटी पॉलिसीज आहेत. त्यामुळे एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना जर फटका बसत असेल तर ही चिंतेची बाब आहे.
Web Title: Lic Share Price Reduce Investors Lost Their Money
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..