
Share Market Closing : घसरणीसह बाजार बंद; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Share Market Closing : आठ दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजाराचा घसरणीसह बंद झाला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक 63000 च्या खाली घसरला असून 415 अंकांच्या घसरणीसह 62,868 अंकांवर बंद झाला आहे. निफ्टी 116.40 अंकांच्या घसरणीसह 18,696 अंकांवर बंद झाला.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
आज बाजारात सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी या क्षेत्रातील समभाग घसरले. फक्त रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभाग देखील लवकर बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 32 शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्यामुळे सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 समभाग वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
तेजीचे शेअर्स :
तेजी असलेल्या शेअर्नस मध्ये डॉ. रेड्डी 1.18 टक्के, टाटा स्टील 1.13 टक्के, टेक महिंद्रा 1.11 टक्के, इंडसइंड बँक 0.56 टक्के, एचसीएल टेक 0.35 टक्के, भारती एअरटेल 0.29 टक्के, Axis बँक 0.25 टक्के. टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.18 टक्के, एनटीपीसी 0.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
घसरणीचे शेअर्स :
घसरण झालेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 2.08 टक्के, एचयूएल 1.59 टक्के, नेस्ले 1.52 टक्के, मारुती सुझुकी 1.52 टक्के, एचडीएफसी 1.38 टक्के, एशियन पेंट्स 1.29 टक्के, बजाज 13 टक्के, फायनान्स 1.13 टक्के. पॉवर ग्रिड 1.08 टक्के, सन फार्मा 1.07 टक्के आणि आयसीआयसीआय बँक 1.07 टक्क्यांनी घसरून बंद झाले.