esakal | अल्पबचत योजनांचे व्याजदर पुन्हा कायम ;सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

saving account

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2020) अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत.

अल्पबचत योजनांचे व्याजदर पुन्हा कायम ;सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली:  केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2020) अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग दुसऱ्या वेळी व्याजदरकपात न केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. 

पहिल्या तिमाहीत सरकारने व्याजदरात मोठी कपात केली होती. त्यावेळी या योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्के ते 1.40 टक्के इतकी मोठी कपात केल्याने गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती. 

अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), , आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आदी योजनांचा समावेश होतो. 

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांचं घर किती हजार कोटींचं?

या योजना प्रामुख्याने पोस्टाच्या; तसेच निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जातात आणि या योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. 

रिटेल क्षेत्रात वॉलमार्ट-टाटा एकत्र येणार?

अल्पबचत योजनांचे व्याजदर -
पीपीएफ -  7.1 टक्के 
एनएससी -  6.8 टक्के 
केव्हीपी - 6.9 टक्के  (124 महिन्यांत दुप्पट)
पाच वर्षीय टीडी - 6.7 टक्के 
एमआयएस -  6.6 टक्के 
आरडी- 5.8 टक्के 
एससीएसएस-  7.4 टक्के 
एसएसवाय - 7.6 टक्के