महिन्याच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या; डिसेंबरपासून 225 रुपयांची वाढ

gas_cylinder
gas_cylinder

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढल्याने लोकांना महामाईची मार सोसावी लागणार आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.  एक मार्च म्हणजे आजपासून घरगुती गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता 14.2 किलोग्रॅम सिलिंडरची किंमत 819 रुपये झाली आहे. 

25 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला होता. आता आणखी यात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये सब्सिडी आणि कमर्शियल अशा दोन्ही गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. सब्सिडी असणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढल्यामुळे 845.50 रुपये झाले आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 19 रुपयांनी वाढली आहे. 

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये 1 डिसेंबरपासून आतापर्यंत गॅस सिलिंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे. 1 डिसेंबरला गॅसची किंमत 594 रुपयांवरुन 644 रुपये झाली होती. त्यानंतर 1 जानेवारीला सिलिंडरची किंमत 644 रुपयांवरुन 649 रुपये झाली होती. त्यानंतर 4 फेब्रुवारीला 694 रुपयांवरुन 719 रुपये आणि 15 फेब्रुवारीला 719 रुपयांवरुन 769 रुपयांवर किंमत गेले.  त्यानंतर 25 फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या.  त्यामुळे किंमत 794 रुपये झाली. आता 1 मार्चला गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा 25 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किंमती 819 रुपये झाल्या आहेत. 

चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमती 835 रुपये झाल्या आहेत. 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 1,614 रुपये झाली आहे. याआधी सिलिंडरची किंमत 1,523.50 रुपये होती. मुंबईमध्ये 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 1563.50 रुपये ,चेन्नईत 1730.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1681.50 रुपये झाली आहे. वाढत्या गॅस सिलिंडरमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com