esakal | PM मोदींना लस देणारी नर्स कोण आहे? दबक्या आवाजात काय सुरुय चर्चा?

बोलून बातमी शोधा

narendra modi}

देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.  या टप्प्यातील पहिली लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

PM मोदींना लस देणारी नर्स कोण आहे? दबक्या आवाजात काय सुरुय चर्चा?
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.  या टप्प्यातील पहिली लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर लोकांना आवाहन केलं की, देशातील लोकांना न घाबरता कोरोनाची लस घ्यावी. पंतप्रधान मोदी यांनी पुदुचेरीच्या नर्स पी निवेदा यांच्याकडून लस टोचून घेतली. विशेष म्हणजे त्यांनी भारत बायोटेकची पूर्णपणे स्वदेशी कोवॅक्सिन लस टोचून घेतली. स्वत: पंतप्रधानांनी कोरोनाची लस घेतल्याने याबाबत असणाऱ्या शंका दूर होण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी लस घेत असल्याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये दोन नर्स दिसत आहेत. यातील एक नर्स पंतप्रधान मोदी यांच्या मागे उभी ठाकलेली दिसत आहे आणि एक नर्स त्यांना लस टोचत आहे. लस टोचणाऱ्या महिलेचं नाव पी निवेदा आहे. त्या पुदुचेरीच्या राहणाऱ्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभी राहिलेली नर्स केरळची रहिवाशी आहे. येत्या काळात केरळ, पुदुचेरीसह अन्य पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. या दोन्ही नर्स केरळ आणि पुदुचेरीतून येत असल्याने यामागे काही राजकीय हेतू आहे का, अशी राजकीय चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. 

'शशी थरुरांसारखं इंग्रजी बोलण्याची रेसीपी'; पाकिस्तानी कॉमेडीयनच्या...

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. सरकारमधील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस का घेतली नाही, असे प्रश्न विचारले जात होते. अनेकांनी भारत बायोटेकच्या स्वदेशी कोवॅक्सिन लशीसंबंधी शंका व्यक्त केली होती. सरकारकडून सांगण्यात आलं होतं की वेळ आल्यानंतर लोकप्रतिनिधींना लस दिली जाईल. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोरोनाची लस घेतली आहे. शिवाय मोदींनी भारत बायोटेकची लस घेतली आहे. त्यामुळे लशीबाबत असणाऱ्या शंका दूर होण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे. 

Corona : लसीकरणाच्या 2 ऱ्या टप्प्यात PM मोदींनी घेतली लस; काल देशात 106...

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 15,510 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,10,96,731 वर पोहोचली आहे. काल देशात 11,288 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,07,86,457 वर पोहोचली आहे. काल देशात 106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण मृतांची संख्या ही  1,57,157 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,68,627 वर पोहोचली आहे. भारतात गेल्या 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत 1,43,01,266 जणांना लच दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.