73.5 रुपयांनी महगला LPG गॅस, जाणून घ्या नवे दर

lpg gas
lpg gaslpg gas

LPG Gas Cylinder Price : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता बिगर सबसिडीच्या घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीमध्येही पुन्हा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजेच एक ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 73.5 रुपयांनी वाढ केली. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे.

मे आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. जुलैमध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, ऑगस्टमध्ये घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तशाच आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 834.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

lpg gas
महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना केंद्राचा इशारा

LPG ची किंमत कशी तपासाल?

LPG सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जा. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळावर तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत पाहू शकता.

lpg gas
...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com