22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली

cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000
cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000

नवी दिल्ली : काही दिवसांपासून बिटकॉइनमध्ये (Market Crash) सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी बिटकॉइनमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. शनिवारी (ता. १८) बिटकॉइन २०,००० डॉलरच्या खाली आली. याने बिटकॉइन १८ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली. आज बिटकॉइन (Bitcoin) यूएसडी १९,३५९.७० वर व्यापार करीत होता. बिटकॉइन यावर्षी सुमारे ५९ टक्क्यांनी घसरले आहे, हे विशेष... तर प्रतिस्पर्धी क्रिप्टोकरन्सी इथरियम-समर्थीत इथरने विक्रमी ७३ टक्के घसरण केली आहे. (cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000)

ही मोठी घसरण जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे झाली आहे. कोरोना महामारीमुळे जागतिक मंदी, फेब्रुवारीपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि फेडरल बँकेने व्याजदरात केलेली वाढ ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीत सतत वाढीव व्यापार करीत असलेले टिथर कॉईनही खाली आले आहे. ते ८३.४३ रुपयांपर्यंत किरकोळ कमी झाले आहे.

cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000
२० मांजरींनी घेतला मालकिणीचा जीव; दोन आठवड्यांपासून होत्या उपाशी

जगातील सर्वांत लोकप्रिय बिटकॉइनमध्ये २४ तासांत नऊ टक्क्यांची घसरण (Crypto Market Crash) झाली आहे. त्याचे मूल्य १,५३,५८४ रुपयांनी घसरून १६,०९,१८८ रुपयांवर आले आहे. या किमतीत बिटकॉइनचे बाजार भांडवलही ३१.४ ट्रिलियनवर घसरले आहे. याशिवाय बिटकॉइननंतर (Bitcoin) दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक पसंती असलेली क्रिप्टोकरन्सी (Crypto) इथरियमची किंमतही ९.२३ टक्क्यांनी घसरली आहे. ती ८,४९९ रुपयांनी घसरून ८३,६१८ रुपयांवर आली आहे. मार्केट कॅप देखील १०.५ ट्रिलियनवर घसरले आहे.

२२ लाख कोटी बुडाले

प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. गेल्या सात दिवसांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Crypto Market Crash)) गुंतवणूक करणाऱ्यांचे २२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हा आठवडा केवळ क्रिप्टो मार्केटसाठीच नाही तर शेअर बाजारांसाठीही वाईट ठरला आहे. अमेरिकेपासून भारतीय बाजारांपर्यंत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

cryptocurrency market crash 22 lakh crore sunk; Bitcoin below 20,000
Presidential Candidate : पवार, अब्दुल्ला यांच्यानंतर गांधी यांचाही नकार

गुंतवणुकीला आणखी जोखमीची बनवत आहे

महागाईचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीसारख्या जोखमीच्या मालमत्तेतून पैसे काढून घेत आहेत. वाढत्या मंदीची भीती क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला आणखी जोखमीची बनवत आहे. तेव्हा सावधगिरीने क्रिप्टोमध्ये व्यवहार करा. बिटकॉइन खरेदी करण्याबाबत सावधगिरी बाळगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com