Presidential Candidate : पवार, अब्दुल्ला यांच्यानंतर गांधी यांचाही नकार

Gopal Krishna Gandhi also refused to run for the presidency
Gopal Krishna Gandhi also refused to run for the presidencyGopal Krishna Gandhi also refused to run for the presidency

नवी दिल्ली : काही दिवसांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, उमेदवाराबाबत विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत झालेले नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला होता. यानंतर फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनीही नकार दिला. आता महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी (Gopal Krishna Gandhi) यांनीही विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला आहे. (Gopal Krishna Gandhi also refused to run for the presidency)

संयुक्त विरोधी पक्षाने माझ्या नावाचा विचार केला याबद्दल आभारी आहे. मात्र, माझ्यापेक्षा चांगले राष्ट्रपती सिद्ध होऊ शकणारे दुसरे नाव शोधा, अशी विनंती विरोधकांना करतो, असे गोपाळकृष्ण गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे. याआधी १५ जून रोजी विरोधकांकडून उमेदवारी देण्याच्या चर्चेवर काहीही भाष्य करणे घाईचे होईल, असे ते म्हणाले होते.

Gopal Krishna Gandhi also refused to run for the presidency
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शूटर्सला अटक; शस्त्रे व स्फोटके जप्त

विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी गोपाल कृष्ण गांधी यांच्याशी फोनवर बोलून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्याची ऑफर दिली होती. यापूर्वी २०१७ मध्येही विरोधकांनी त्यांना व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले होते. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गोपाळ कृष्ण गांधी यांनी २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. तसेच आफ्रिका व श्रीलंकेत भारतीय उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे.

नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत (presidency Candidate) गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेससह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवार होण्यास नकार दिला होता. त्यांच्याशिवाय फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनीही नाही म्हटले होते. अशा स्थितीत गोपाळ कृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनीही नकार दिल्याने विरोधकांना नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com