
- भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नवीन वर्षात जानेवारी 2020 पासून मोठा बदल करण्याचा घेतलाय मोठा निर्णय.
नवी दिल्ली : भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नवीन वर्षात जानेवारी 2020 पासून विविध वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात वाहनांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने कंपनीकडून निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीनें स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ होईल.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
गेल्या वर्षभरात उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याने एकूण उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, वाहनांच्या किमती वाढवणार असून, ग्राहकांवर याचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ नेमकी किती असेल ते मात्र कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही
मागील वर्षभरापासून वाहन उत्पादक कंपन्यांना मंदीचा सामना करावा लागत आहे. सणासुदीला मारुतीच्या विक्रीत काही सुधारणा दिसून आल्या. सलग सात महिन्यांच्या घसरणीनंतर ऑक्टोबरमध्ये विक्रीत 2.3 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत पुन्हा 3.3 टक्क्यांची घसरण झाली.