मारुती सुझुकीच्या विक्रीत मे महिन्यात ८९ टक्क्यांची घट

Maruti-suzuki
Maruti-suzuki
Updated on

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लि.च्या विक्रीत मे महिन्यात ८९ टक्क्यांची घट झाली आहे. मे महिन्यात मारुतीने देशांतर्गत बाजारपेठेत १३,८६५ वाहनांची विक्री केली आहे. तर मे २०१९ मध्ये कंपनीने १,२५,५५२ वाहनांची विक्री केली होती. मे २०२० मध्ये मारुतीने ४,६५१ वाहनांची निर्यात केली आहे. कंपनीच्या निर्यातीत मागील वर्षभरात ४८.८ टक्क्यांची घट झाली आहे. 
कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम कंपनीच्या कामकाजावर आणि विक्रीवर झाला आहे.

१२ मेपासून मारूतीने सरकारने लागू केलेल्या नियम आणि निकषांप्रमाणे उत्पादन प्रकल्पातील कामकाज सुरू केले होते. मानेसर येथील कामकाज १२ मेपासून तर गुरुग्राम येथील कामकाज १८ मेपासून सुरू करण्यात आली होती. तर २५ मेपासून २०२० सुझुकी मोटर गुजरात प्रा. लिचे (एसएमजी) उत्पादन सुरू करण्यात आले आहे. एसएमजी मारुती सुझुकीसाठी कंत्राटी पद्धतीने कारचे उत्पादन करते. याशिवाय कंपनीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शोरुमदेखील सुरू करण्यात आले आहेत.

* विक्रीत मे महिन्यात ८९ टक्क्यांची घट
* देशांतर्गत बाजारपेठेत १३,८६५ वाहनांची विक्री 
*  मे २०१९ मध्ये कंपनीने १,२५,५५२ वाहनांची 
*  मे २०२० मध्ये मारुतीने ४,६५१ वाहनांची निर्यात 

सर्व देशातील शोरुम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. कन्टेंमेंट झोन किंवा निर्बंध असलेल्या विभागाव्यतिरिक्त इतरत्र स्थानिक नियमावलीप्रमाणे शोरुम सुरू केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे. टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आलेल्या उद्योग-व्यवसायांमुळे अर्थचक्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र याआधी एप्रिल २०२० मध्ये मारुतीप्रमाणेच वाहन उद्योगातील इतर कंपन्यांदेखील एकाही वाहनाचे उत्पादन करता आले नव्हते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com