Fight with Corona : रिलायन्स इंडस्ट्रीजकडून PM फंडला ५०० कोटींची अतिरिक्त मदत!

Nita-Mukesh-Ambani
Nita-Mukesh-Ambani

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सोमवारी(ता.१) पंतप्रधान फंडला आणखी 500 कोटी रुपयांची मदत दिली. देशातील पहिले कोरोना व्हायरस रूग्णालय, लक्षावधी गरजूंना जेवण आणि आपत्कालीन वाहनांना इंधन या सेवांव्यतिरिक्त अंबानी यांनी वरील निधी दिला आहे.

पंतप्रधानांच्या निधीला दिलेल्या आर्थिक योगदानाबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला कोविड-19 च्या विरोधातील लढाईला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) पंतप्रधानांनी कोरोना व्हायरस हल्ल्याविरोधात देशाच्या लढाईला पाठिंबा देण्याच्या आवाहनाला उत्तर देताना पंतप्रधान फंडाला 500 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली, असे आरआयएलच्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस  विरूद्धच्या या कृती योजनेवर त्यांनी रिलायन्स फॅमिलीची ताकद यापूर्वीच तैनात केली आहे आणि आरआयएलची टीम शहर आणि खेड्यापाड्यात पोहोचून सर्वतोपरी मदत करत आहेत.

“आम्हाला खात्री आहे की, कोरोना व्हायरस या संकटावर भारत लवकरच विजय मिळवेल. संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजची टीम या संकटाच्या घटनेत देशाबरोबर आहे आणि कोविड-19 विरुद्ध ही लढाई जिंकण्यासाठी सर्व काही करेल,” असे आरआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले. 

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, कोविड-19 विरुद्ध लढायला एकत्र येत असताना रिलायन्स फाऊंडेशनमधील आपण सर्वजण आपल्या देशवासीय आणि महिलांसह विशेषत: ज्या आघाडीवर आम्ही आमचे वचन देतो त्या सर्वांशी एकजुटीने उभे आहोत. आमच्या डॉक्टरांनी आणि कर्मचार्‍यांनी भारताचे पहिले कोविड-19 हॉस्पिटल सुरू करण्यात मदत केली आहे आणि कोविड-19 च्या संपूर्ण तपासणी, चाचणी, प्रतिबंध आणि उपचारांमध्ये सरकारला सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत. सीमान्त आणि दैनंदिन मजुरीवरील समुदायांना मदत करणे ही काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

“आम्ही दररोज देशभरातील लाखो लोकांना अन्नसेवा द्यायचे लक्ष्य ठेवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आरआयएलने तात्पुरत्या कामगारांना मानधन, एक सुसज्ज कोविड-19 रुग्णालय स्थापन करणे, फेसमास्क उत्पादन वाढविणे यासह कोरोना व्हायरसच्या पेशंटसाठी मदत म्हणून अनेक उपाययोजना घोषित केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com