कोरोनाकाळात मुकेश अंबानी यांनी किती कोटी कमावले?

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 September 2020

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तासाला किती पैसे कमावत असतील, असा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला पडला असेल.

नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तासाला किती पैसे कमावत असतील, असा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला पडला असेल. तर मुकेश अंबानी गेल्या सहा महिन्यांपासून दर तासाला तब्बल 90 कोटी रुपये कमावत आहेत. कोरोनामुळे जगासह देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. अशा स्थितीतही ही कमाई अचंबित करणारी आहे.  हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड यांनी आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाची 2020च्या रिच लिस्टची नववी आवृत्ती आज प्रकाशित झाली.  31 ऑगस्ट 2020 पर्यंत 1 हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक मालमत्ता असलेले भारतातील सर्वात श्रीमंत लोकांचा या यादीत सामावेश आहे. 

सलग नवव्यांदा मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर-
या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी पहिल्या स्थानावर आहेत. हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड अहवालानुसार मुकेश अंबानी यांचे एकूण उत्पन्न 6 लाख 58 हजार 400 कोटी रुपये आहे. मागील 12 महिन्यांत त्यांची एकूण संपत्ती 73 टक्क्यांनी वाढली आहे. या 2020 मधील आवृत्तीत 828 भारतीयांचा समावेश आहे.

सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर

रिपोर्टनुसार, 2020च्या मार्च ते ऑगस्ट या कालावधीत 63 वर्षीय अंबानींचे दर तासाची कमाई 90 कोटी रुपये होती. मुकेश अंबानी सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून जगातीलल श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

क्रमांक    उद्योगपती   उत्पन्न (करोडमध्ये)    कंपनी
1   मुकेश अंबानी 6,58,400 रिलायंस इंडस्ट्रीज
2   हिंदुजा ब्रदर्स 1,43,700 हिन्दुजा
3   शिव नाडर  1,41,700 एचसीएल
4   गौतम अदानी  1,40,200 अदानी
5   अजीम प्रेमजी 1,14,400 विप्रो

 

चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग

दुसऱ्या स्थानावर हिंदुजा बंधू-
लंडनस्थित हिंदुजा बंधूंची एकून मालमत्ता 1 लाख 43 लाख 700 कोटी रुपये असून ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुढे तिसऱ्या क्रमांकावर एचसीएलचे (HCL) संस्थापक शिव नाडर असून त्यांची मालमत्ता 1 लाख 41 हजार 700 कोटींची आहे. त्यानंतर गौतम अदानी आणि कुटुंब चौथ्या स्थानावर आहे आणि अझीम प्रेमजी पाचव्या स्थानावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukesh ambani tops in rank of richest man in india