Multibagger Stocks : 4 महिन्यात 485% वाढला हा मल्टीबॅगर शेअर, आता स्टॉक स्प्लिट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multibaggers

Multibagger Stocks : 4 महिन्यात 485% वाढला हा मल्टीबॅगर शेअर, आता स्टॉक स्प्लिट...

आयटी उद्योगाशी संबंधित असलेल्या स्मॉल कॅप कंपनी फोर्थ डायमेंशन सोल्युशन्सच्या (Fourth Dimension Solution) शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये चांगली वाढ झाली आहे. सध्या त्याच्या एका शेअरची किंमत 127.70 रुपये आहे.

आता कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. 23 जानेवारीला अर्थात आज हा शेअर एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करेल. कंपनीने 23 जानेवारी ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. स्प्लिटनंतर, शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 2 रुपयांपर्यंत खाली येईल.

हेही वाचा: Share Market : भारीच! 'या' स्टील कंपनीने केवळ 3 महिन्यात दिला दुप्पट रिटर्न; गुंतवणूकदारांची झाली चांदी

कंपनीने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 5.3 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा केवळ 3.91 लाख रुपये होता.

प्रमोटर्सकडे कंपनीचा सुमारे 93.33% हिस्सा आहे आणि बाकी 6.67% लोकांचा आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 1.69 कोटी निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 1.08 लाख होता. यासह, तिमाहीत खर्चही मागील वर्षीच्या 13 लाख रुपयांवरून 5.3 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

हेही वाचा: Best Stock : 1 लाखाचे 74 लाख, 'हा' स्मॉलकॅप स्टॉक तुम्हालाही माहिती आहे?

या शेअरने गेल्या 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 19% परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 485 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सना अप्पर सर्कीट लागले होते.

कंपनीचे मार्केट कॅप 415.95 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 मध्ये एका शेअरची किंमत 22.90 रुपये होती, जी आज 127.70 रुपये प्रति शेअर झाली आहे. याचा अर्थ सुमारे 4 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या पैशात 5 पटीने वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.