Share Market : भारीच! 'या' स्टील कंपनीने केवळ 3 महिन्यात दिला दुप्पट रिटर्न; गुंतवणूकदारांची झाली चांदी

सध्या हा शेअर 255 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market : जिंदाल स्टेनलेसचे (Jindal Stainless) शेअर्स सध्या चांगली कामगिरी करत आहेत. शुक्रवारी बीएसईवर या शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून अधिक तेजी दिसली आणि हा शेअर 263.10 रुपयांवर पोहोचला.

हा स्टॉकचा नवा सार्वकालिक उच्चांक (All Time High) आहे. यापूर्वी, स्टॉकने 2 जानेवारी 2023 रोजी 255 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. विशेष बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांत या शेअरने जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या एका महिन्यात जिंदाल स्टेनलेसच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची मजबूत तेजी दिसली. स्टॉकने सहा महिन्यांत सुमारे 125 टक्के मजबूत परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 255 रुपयांवर ट्रेड करत आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

ओपी जिंदाल यांनी 1970 मध्ये स्थापित केलेल्या, जिंदाल स्टेनलेसची वार्षिक मेल्ट क्षमता 1.9 MT आहे आणि वार्षिक टर्नओवर 4.2 अब्ज डॉलर (मार्च 2022 पर्यंत) आहे. कंपनी आता ही क्षमता 2.9 MT पर्यंत वाढवणार आहे.

क्वांट म्युच्युअल फंड-स्मॉलकॅप फंडाने 6 डिसेंबरला जिंदाल स्टेनलेसचे 26.3 लाख शेअर्स विकत घेतले, जे कंपनीतील 0.52 टक्के शेअर्सच्या बरोबर आहेत. ही डील 182.97 रुपये प्रति शेअर या दराने झाली.

एक्सचेंजने ही माहिती दिली. जिंदाल स्टेनलेसचा नफा आणि व्हॉल्यूम सुधारण्याचा विश्वास आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, जेयुएसएलच्या अधिग्रहणामुळे मार्जिन सुधारण्याची अपेक्षा आहे. विश्लेषकांनी शेअरवर 'बाय' रेटींगह 270 रुपयांचे टारगेट दिले आहे.

Share Market
Budget 2023 : अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com