Stock to Buy
Stock to BuyEsakal

नाल्को शेअर्समध्ये येणार जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Stock to Buy: जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने नाल्कोबाबत चांगला अहवाल दिला आहे.
Published on

Stock to Buy: सरकारी खाण कंपनी नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडवर (Nalco) ब्रोकरेज हाऊससह तज्ज्ञांचा विश्वास वाढत चालला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने नाल्कोबाबत चांगला अहवाल दिला आहे. जेपी मॉर्गनने कंपनीच्या चांगल्या कमाईच्या दृष्टिकोनावर नाल्कोचे रेटिंग 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट' केले आहे. यासह, प्रति शेअर टारगेटमध्येही लक्षणीय वाढ केली आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा नाल्कोमध्ये 1.4 टक्के हिस्सा आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांनी या शेअरमधून जोरदार कमाई केली आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीने वाढले. (Nalco shares will rise sharply, do you have this stock?)

Stock to Buy
ITC Shares: मार्चमध्ये 17 टक्क्यांची वाढ, 16 महिन्यांतील उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

नाल्कोचे (Nalco) शेअर्स 35% वाढू शकतात-

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने नॅशनल अ‍ॅल्युमिनियमबाबत नाल्कोबाबत (Nalco) चांगला अहवाल दिला आहे. स्टॉकवर 'ओव्हरवेट' रेटिंगसह टारगेट 158 रुपये करण्यात आले आहे. नाल्कोच्या कमाईत आगामी काळात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात कंपनी अधिक डिव्हिडेंट देईल, असा विश्वास आहे. 30 मार्चला नाल्कोच्या शेअरची किंमत 117 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 35 टक्के परतावा मिळू शकतो.

Stock to Buy
Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्स 95 तर निफ्टी 21 अंकांच्या वाढीसह सुरु

राकेश झुनझुनवालांची 1.4% भागीदारी-

शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची नाल्को (NALCO) या सरकारी खाण कंपनीत 1.4 टक्के (25,000,000 इक्विटी शेअर्स) हिस्सेदारी आहे. ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 37 स्टॉक्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 33,583.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टेक, फायनान्स, रिटेल आणि फार्मा स्टॉकचा समावेश आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com