...म्हणून पॉवर मेक प्रोजेक्ट्समधील गुंतवणूक ठरेल फायद्याची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

...म्हणून पॉवर मेक प्रोजेक्ट्समधील गुंतवणूक ठरेल फायद्याची

sakal_logo
By
सुशांत जाधव

आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत पॉवर मेक प्रोजेक्ट्सचा (Power Mech Projects) कंसोलिडेटड महसूल वार्षिक 56.2 टक्क्यांनी वाढला, पण ब्रोकरेज हाऊस निर्मल बंगच्या अंदाजापेक्षा कमी झाला. आपल्या मार्जिनमध्ये आणखी वाढ होईल असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचा अंदाजही व्यवस्थापनाने वर्तवला आहे.

ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म निर्मल बंगने या मल्टीबॅगर स्टॉक पॉवर मेक प्रोजेक्ट्समध्ये (Power Mech Projects) आपले टार्गेट 1050 रुपयांवरून 1,130 रुपये केले आहे. कंपनीचे मजबूत ऑर्डर बुक लक्षात घेता त्यांचे सध्याचे मूल्यांकन (Valuation) महाग नाही असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कंपनीसिव्हिल सेगमेंटमध्ये (Civil Segment) प्रवेश करत आहे, ज्यामुळे तिला येत्या काळात आणखी फायदा होईल.

हेही वाचा: 2022 पासून आयुर्विमा पॉलिसी महागणार, जाणून घ्या नवा प्रीमियम!

यावर्षी आतापर्यंत पॉवर मेक प्रॉजेक्टच्या शेअरने 112 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत कंपनीच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळेल असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. कंपनी ऊर्जा, इन्फ्रा, धातू, खनिज, रेल्वे क्षेत्रातही संधी शोधत आहे. कंपनीला NMDC कडून 2 खनिज संबंधित प्रकल्प मिळतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा

कंपनीला 725 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. यापैकी, पहिली ऑर्डर 645 कोटी रुपयांची आहे जी NHAI ची आहे आणि दुसरी ऑर्डर 80 कोटी रुपयांची आहे जी हॉवे इंडियाची आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 27 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 55.10 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 347.55 कोटी रुपयांवरून सप्टेंबर तिमाहीत 544.29 कोटी रुपये झाले आहे.

टीप : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top