
यापूर्वी एमएसएमई, नोकर वर्ग, करदाता, शेतकरी, छोटे व्यापारी फेरीवाले आणि प्रवासी मजूर यांच्यासाठी काही प्रमुख तरतूदी केल्याचे अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
नवी दिल्ली : Finance Minister Nirmala Sitharaman live: 'आत्मनिर्भर भारत' atmanirbhar bharat अभियानाच्या अंतर्गत जारी करण्यात आलेल्या 20 लाख कोटी पॅकेजमधून अन्य कोणत्या घटकांना दिलासा मिळणार याची उत्सुकता लागून होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी तिसऱ्या पत्रकार परिषदेतून काही नव्या घोषणा केल्या आहेत. यापूर्वी एमएसएमई, नोकर वर्ग, करदाता, शेतकरी, छोटे व्यापारी फेरीवाले आणि प्रवासी मजूर यांच्यासाठी काही प्रमुख तरतूदी केल्याचे अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता शेतकरी वर्ग आणि मत्स उद्योगांच्या उभारीसाठी आवश्यक निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वाचा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा
#WATCH Live from Delhi: FM Nirmala Sitharaman briefs the media #Economicpackage https://t.co/pvVjn1Dcaj
— ANI (@ANI) May 15, 2020
'जीडीपी'मधील प्रबळ दावेदार असणाऱ्या सेवा क्षेत्राला हवे 'आर अँण्ड डी'चे बूस्टर!
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. उद्योग-धंदे ठप्प झाले असून कोरोनाचा सामना करताना आर्थिक संकटाचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर उभे आहे. देशाची कोलमडलीली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपतकालीन परिस्थितीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजचे वाटप कशा प्रकारे होणार याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन टप्प्याटप्याने देत आहेत.