
केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई - केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहे. बँकिंग क्षेत्राला देखील फटका बसला आहे. मात्र बँकांसाठी काहीच दिले नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज बँकिंग क्षेत्राला खूश करण्यात अपयशी ठरले असल्याचे मराठे यांनी म्हटले आहे.
मराठे हे सध्या रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे अर्धवेळ संचालक असून त्यांचा सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. पतमानांकन संस्था असलेल्या 'क्रिसिल'च्या अहवालावर प्रतिक्रिया देत मराठे यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजवर टीका केली आहे.
रिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज उद्योगांची सध्याची स्थिती आणि दूरदृष्टी ठेवून तयार केले आहे. सर्व क्षेत्रांना कमी अधिक प्रमाणात या सामावून घेण्यात आले आहे. मात्र पॅकेजमध्ये बँकिंग क्षेत्रासाठी विशेष कोणतीही तरतूद केलेली नाही. आर्थिक संकटात बँकांना केंद्रबिंदू मानून आत्मनिर्भर पॅकेजमध्ये या क्षेत्राला प्राधान्य देणे अपेक्षित होते. बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. मात्र बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच राहिले आहेत.
म्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका
सध्या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार तीन महिने 'ईएमआय हॉलिडे' जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्यात आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे.
बँकांवर सध्या अधिक दबाव असून बुडीत कर्जे आणि तरतुदीसाठी केंद्र सरकारने मदत करणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्राला आर्थिक पॅकेजमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे, असे मत मराठे यांनी व्यक्त केले आहे.
* बँकिंग क्षेत्राचे हात रिकामेच
* कोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम
* मराठे यांची आत्मनिर्भर भारत पॅकेजवर टीका