LIC IPO: आता किराणा दुकानांमध्येही आयपीओ अर्जाची सुविधा

पेटीएम मनीने मोफत डिमॅट खाती उघडण्यासाठी दुकानांत क्यूआर कोड्स लावले
 IPO
IPOSakal

पेटीएम ब्रॅण्डची मालकी जिच्याकडे आहे ती भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज असे जाहीर केले की, कंपनीच्या पूर्णपणे मालकीची उपकंपनी पेटीएम मनी, एलआयसी आयपीओ, रिटेल दुकानांमध्ये घेऊन जाण्यास सज्ज आहे. (Now IPO application facility is also available in grocery stores)

मोफत डिमॅट खात्यांद्वारे आयुष्यभर गुंतवणूक करत राहण्यातील शक्ती सामान्य माणसाला समजावून देण्याच्या उद्देशाने, कंपनीने देशभरातील किराणा दुकानांवर क्यूआर कोड्स लावले आहेत. हे क्यूआर कोड्स वापरून कोणतीही व्यक्ती सुलभतेने आपले डिमॅट खाते उघडू शकेल. डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी अनिवार्य असते. हे खाते उघडून लोक एलआयसी आयपीओसाठी बोली लावू शकतील.

 IPO
ब्रेकिंग : RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ; कर्जांचे हप्ते महागणार

एलआयसी आयपीओ भारतातील सर्वांत मोठे पदार्पण करत आहे आणि हा ब्रॅण्ड देशात सर्वव्यापी आहे हे लक्षात घेता, पेटीएमने भागीदारी केलेल्या व्यापारी दुकानांमध्ये क्यूआर कोड्स लावले जात आहेत. यामुळे गुंतवणूकदार आयपीओसाठी सहज अर्ज करू शकतील याची निश्चिती होईल. या उपक्रमामुळे लोकांना मोफत डिमॅट खाती उघडता येतील आणि त्याद्वारे भांडवल बाजारांतील रिटेल सहभागाच्या वाढीत योगदान दिले जाईल.

पेटीएम मनीचे प्रवक्ता म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भांडवल बाजारांमध्ये रिटेल गुंतवणूकादारांचा सहभाग वाढताना दिसत आहे आणि त्याला एलआयसी आयपीओच्या माध्यमातून आणखी वाढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अनेक नवीन गुंतवणूक आपला संपत्ती व्यवस्थापनाचा प्रवास सुरू करण्यास उत्सुक असतील हे गृहीत धरता, आम्ही पेटीएम व्यापारी भागीदारांच्या दुकानांमध्ये आमचे क्यूआर कोड्स लावत आहोत.

या कोड्सद्वारे लोकांना मोफत डिमॅट खाती उघडता येतील. पेटीएम मनी हजारो छोट्या गुंतवणूकदारांचे सक्षमीकरण करून त्यांना त्यांचा आयपीओ प्रवास सुरळीत व अखंडित पद्धतीने सुरू करण्यात कशी मदत करत आहे, हे यातून दिसून येते.”

 IPO
Share Market: RBIच्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळसा; सेन्सेक्स 1,306 तर निफ्टी 391 अंकांनी घसरला

उच्च निव्वळ संपत्ती धारक व्यक्तींना (एचएनआय), बँक एएसबीए प्रवाहांच्या माध्यमातून न जाता, यूपीआयमार्फत ५,००,००० रुपयांपर्यंतच्या चढ्या बोली लावण्याची मुभा देणारा पेटीएम मनी हा देशातील पहिला डिस्काउंट ब्रोकर ठरला आहे. याशिवाय, रिटेल गुंतवणूकदार प्रवर्गाशिवाय, एलआयसी आयपीओकरता अर्ज करण्यास पात्र असलेल्या पॉलिसीधारकांसाठी कंपनीने स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला आहे.

 IPO
LIC IPO Live Updates: आतापर्यंत 33 टक्के विक्री; पॉलिसीधारकांची 1.16 पट खरेदी

पेटीएम मनीच्या माध्यमातून एलआयसी आयपीओसाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या:

• पेटीएम मनीच्या होम स्क्रीनवरील आयपीओ विभागावर जा.

• प्राधान्यानुसार गुंतवणूकदाराचा प्रकार निवडा. ५ लाख रुपयांहून अधिक बोली लावण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती एचएनआय प्रवर्गाचा पर्याय निवडून हे करू शकतात. एचएनआय गुंतवणूक प्रकारातील वितरण हे प्रमाणबद्ध रितीने, या प्रवर्गातील आयपीओसाठी आलेल्या सबस्क्रिप्शन संख्येच्या आधारे, केले जाईल.

• जर तुम्ही पॉलिसीधारक असाल, तर आयपीओ डिटेल्स या पेजवर ‘इन्व्हेस्टर टाइप’ खाली जाऊन पॉलिसीहोल्डर्स निवडा. याशिवाय, तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडलेला असणे आवश्यक आहे आणि हा पॅन पेटीएम मनीच्या डिमॅट खात्याशी जोडलेला पॅनच असला पाहिजे. तुम्ही जर या निकषाची पूर्तता करत असाल, तर तुम्ही पॉलिसीहोल्डर हा पर्याय निवडू शकता.

• आयपीओंमधील ‘करंट अँड अपकमिंग’ टॅबमध्ये एलआयसी आयपीओ हा पर्याय उपलब्ध असेल.

• तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘अप्लाय नाऊ’ हे बटन दिसेल, ते बटन तुम्हाला बिड पेजकडे घेऊन जाईल. या पेजवर तुम्ही दर अद्ययावत करू शकता किंवा तुमच्या अर्जावरील संख्या नोंदवू शकता.

• ‘अॅड यूपीआय डिटेल्स’ विभागात तुमचा यूपीआय आयडी अपडेट करा आणि ‘अप्लाय’वर क्लिक करा.

• एकदा का अॅलॉटमेंट झाली की तुम्हाला तुमच्या अॅलॉटमेंट स्थितीबद्दल अधिसूचना येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com