Budget 2019 : कामगारांना मिळणार आता 'एवढे' निवृत्तीवेतन

Friday, 1 February 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्लीः एकवीस हजारांपेक्षा आधीक वेतन असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना तीन हजार रूपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. यासाठी कामगारांना प्रतिममहिना 100 रूपये भरावे लागणार असून, 60 वर्षानंतर तीन हजार निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ देशभरातील 10 कोटी कामगारांना मिळणार आहे, अशी माहिती पियुष गोयल यांनी अर्थ संकल्प सादर करताना दिली.

गोयलांचा मास्टरस्ट्रोक अन् मोदींचं हसू आणि राहुल शांत

शेतकरी आणि कामगारांसाठी मोदी सरकारने अखेरच्या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा केल्या आहेत. शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी गोयल यांनी निवृत्तीवेत योजाना आणली असून, या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ असे असणार आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच लागू कऱण्यात येतील. 21 हजार वेतन असलेल्या मजुरांना सात हजारांचा बोनस देण्यात येणार असून, ग्रॅच्युईटची मर्यादा दहा लाखांवरुन 30 लाखांवर करण्यात आली आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार आहे, असेही गोयल यांनी जाहीर केले आहे.

बँकिंग क्षेत्रासाठी घेतले आहेत मोठे निर्णय..!

15 हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांनाही निवृत्तीवेतनाची घोषणा केली आहे. 60 वर्षावरील मजुरांना तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. नोकरीदरम्यान मृत्यु झाल्यास आर्थीक मदत अडीच लाखांवरुन सहा लाखांवर करण्यात आली आहे.

मोदी सरकारचा असंघटित कामगार, नोकरदारांसाठी मोठा निर्णय
यो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now workers in India to get monthly pension after Budget 2019