तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

'एनएसई'च्या प्रणालीमध्ये ठराविक कंपन्यांच्या किंमती अद्ययावत होत नसल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी-विक्रीची दिलेली ऑर्डर पूर्ण होत नसल्याने काही काळ 'एनएसई'वरील व्यवहार थांबवण्यात आले होते.

मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) ट्रेडिंग व्यवहार प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबवण्यात आले आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, 'एनएसई'च्या प्रणालीमध्ये ठराविक कंपन्यांच्या किंमती अद्ययावत होत नसल्याने गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी-विक्रीची दिलेली ऑर्डर पूर्ण होत नसल्याने काही काळ 'एनएसई'वरील व्यवहार थांबवण्यात आले होते.

एनएसईने सकाळी 9.55 वाजता फ्यूचर्स आणि ऑप्शन्समधील (एफ एंड ओ) व्यवहार बंद केले होते. आता तांत्रिक कारणांमुळे एनएसईच्या रोख आणि एफ व ओ विभागातील थांबविण्यात आला आहे. एनएसईची तांत्रिक टीम यावर काम करत असून लवकरच एनएसईवर नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होतील, असे एक्सचेंजने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSE Shut Down: Monday’s tech glitch brings back memories of 15% crash on October 2012