ब्रिटिश पेट्रोलियम करणार 15 टक्के नोकरकपात

British Petroleum
British Petroleum

* बीपीमध्ये सध्या 70,100 कर्मचारी कार्यरत
* कंपनी करणार 10,000 कर्मचाऱ्यांची कपात
* तेल आणि नैसर्गिक वायू व्यवसायाकडून अपारंपारिक क्षेत्राकडे वळण्याचे कंपनीचे नियोजन

ऊर्जा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमने (बीपी) जवळपास 15 टक्के मनुष्यबळ कपात करणार आहे. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड लुनी यांच्या कंपनीला तेल आणि वायू क्षेत्राकडून अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राकडे वळवण्याच्या योजनेचा भाग म्हणून 'बीपी'ने हा निर्णय घेतला आहे. जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना लुनी यांनी सांगितले की कंपनीत सध्या असलेल्या 70,100 कर्मचाऱ्यांपैकी 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. 

'आम्ही आता ज्या योजनेची अंमलबजावणी सुरू करणार आहोत त्यानुसार येत्या वर्षअखेरपर्यत कंपनीतून 10,000 नोकऱ्यांची कपात केली जाणार आहे', असे लुनी यांनी म्हटले आहे.
या वृत्तानंतर बीपीच्या शेअरच्या किंमतीत 3.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीतून कपात करण्यात येत असणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मुख्यत: नॉन फ्रंटलाईन स्टाफ आणि वरिष्ठ कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती ब्रिटिश पेट्रोलियमने दिली आहे.

बीपीचे इंग्लंडमध्ये 15,000 कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण कर्मचारी कपातीपैकी एक पंचमांश नोकरकपात ही इंग्लंडमधून केली जाणार आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर जगातील ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांप्रमाणेच बीपीनेदेखील 2020 मध्ये खर्चात कपात करण्याचे नियोजन केले आहे. कोरोना संकटामुळे जगातील कच्च्या तेलाच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे.

यावर्षी बीपी 25 टक्के म्हणजेच 12 अब्ज डॉलरची कपात करणार आहे. याशिवाय कंपनी आपल्या व्यवसायाचे डिजिटलायझेशन आणि एकत्रिकरण देखील करणार आहे. कंपनीने खर्चामध्ये यापेक्षाही अधिक कपात करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी लुनी यांनी व्यक्त केले आहे. मार्च 2021 पर्यत कंपनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि बोनस देणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
 टाटा समूहाची, व्होल्टास लि. उभारणार दक्षिण भारतात नवा प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com