SBI ग्राहकांची चांदी! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS व्यवहार फ्री | Arthavishwa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI
SBI ग्राहकांची चांदी! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS व्यवहार फ्री

SBI ग्राहकांची चांदी! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS व्यवहार फ्री

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India - SBI) ने सांगितले की, YONO App सह इंटरनेट बॅंकिंग (Internet Banking) आणि मोबाईल बॅंकिंगद्वारे (Mobile Banking) केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या तत्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहारांसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक आता IMPS द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट त्वरित करू शकतील. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती. (Online IMPS transactions up to Rs five lakh now free for SBI customers)

हेही वाचा: Covidची ऐशीतैशी! भारतीयांनी तोडला सोने खरेदीत दहा वर्षांचा रेकॉर्ड!

तथापि, तुम्ही बॅंकेच्या शाखेत जाऊन IMPS केल्यास, तुम्हाला जीएसटीसह (GST) सेवा शुल्क भरावे लागेल. बॅंकेने ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेच्या शाखांमधून केल्या जाणाऱ्या IMPS व्यवहारांसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सेवा शुल्क "20 रुपये + GST' असेल. या सूचना 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.

डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन बॅंकिंगद्वारे IMPS व्यवहारांवर सेवा शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा व्यवहार YONO ऍप, इंटरनेट बॅंकिंग / मोबाईल बॅंकिंगद्वारे केला जाऊ शकतो.

IMPS अंतर्गत, 1,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहाराच्या रकमेवर कोणतेही सेवा शुल्क आकारले जात नाही. 1,001 ते 10,000 रुपयांपर्यंत 2 रुपये + GST चे शुल्क लागू आहे. 10,001 ते1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 4 रुपये + GST शुल्क आकारले जाते. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 2 लाखांपर्यंत 12 रुपये + GST लागू आहे. हे शुल्क फक्त बॅंकेच्या शाखेतून केलेल्या व्यवहारांवर लागू आहे.

हेही वाचा: सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI

IMPS म्हणजे काय?

IMPS ही एक अभिनव रिअल टाइम पेमेंट सेवा (Real Time Payment Service) आहे जी 24 तास उपलब्ध असते. ही सेवा नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India - NPCI) द्वारे ऑफर केली जाते. हे ग्राहकांना संपूर्ण भारतातील बॅंका आणि RBI द्वारे अधिकृत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्‍युअर्स (Prepaid Payment Instrument Issuers - PPI) द्वारे त्वरित पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम करते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top