Petrol Diesel Price: : सीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price
Petrol Diesel Price: : सीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत

Petrol Diesel Price: : सीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत

Petrol-Diesel CNG Price 15th May 2022: आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही तेलाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही आणि घटही झालेली नाही. महिनाभरानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किंमतीनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहे. तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वेळी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा: Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर:

  • चेन्नई 110.85 रुपये प्रति लिटर 100.94 रुपये प्रति लिटर

  • मुंबई 120.51 रुपये प्रति लिटर 104.77 रुपये

  • कोलकाता 115.12 रुपये प्रति लिटर 99.83 रुपये प्रति लिटर

  • दिल्ली 105.41 रुपये प्रति लिटर 96.67 रुपये

हेही वाचा: Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Web Title: Petrol Diesel Cng Price 15th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top