पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर आढावा सुरु केल्यापासून सलग नऊ दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेल 61 पैशांनी महागले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 7 जूनपासून दररोज किंमतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 82.70 72.64
दिल्ली 75.78 73.03
कोलकाता 77.64 69.80
चेन्नई 79.53 72.18
'ही' महत्त्वाची कामे करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले वाचा सविस्तर..
देशात कोरोनाच्या पासरल्यानंतर 25 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आले होते. परिणामी मागणी घटल्याने दररोजचा इंधन आढावा स्थगित करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उणे झाले होते. मागणी कमी आणि पुरवठा अधिक झाल्याने साठा अधिक झाला. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 40 प्रतिबॅरल डॉलरच्या आसपास आहेत.