Today's Petrol Diesel Price Updates
Today's Petrol Diesel Price Updatessakal media

Petrol-Diesel Price: देश पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे भारतात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

Petrol-Diesel Price Today,13 March 2022: गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून (November 2021) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाल्यानंतरही भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. मात्र शेजारी राष्ट्र श्रीलंकेत मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज असतानाच 13 मार्चलाही भारतीय तेल कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही.

Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या महागणार? तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये, कोलकात्यात १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे.

Today's Petrol Diesel Price Updates
Petrol Diesel Price Today :पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! जाणून घ्या आजची किंमत

भारतातही लवकरच वाढू शकतात किमती-

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरच्या वर राहिली आहे. तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही, मात्र त्यानंतर कच्चे तेल प्रति बॅरल $ 33 पेक्षा जास्त महाग झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर एकदम वाढवण्याऐवजी दररोज किमतीत किरकोळ वाढ करण्याचा विचार करू शकतात, जेणेकरून वाढलेल्या किमतींचा बोजा जनतेवर पडू नये.

अशा प्रकारे घरबसल्या तपासा तेलाच्या किंमती -

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com