Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updates esakal

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे दर

डिझेल 3 ते 4 रुपयांनी तर पेट्रोल 2 ते 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
Published on

Petrol-Diesel Price Updates Today : तेल कंपन्यांनी आज (बुधवार), 18 मे 2022 रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 07 एप्रिलपासून देशभरात स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

त्याच वेळी, दिल्लीत डिझेलची किंमत 96.67 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 104.77 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 115.12 रुपये, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: कच्चे तेल महागले, पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ?

डिझेल-पेट्रोलचे दर पुन्हा वाढणार!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ किमती एकाच वेळी वाढणार नसून, वाहनांच्या इंधनाच्या किमती पूर्वीप्रमाणेच हळूहळू वाढणार आहेत. त्यामुळे आता पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचे दर वाढणार असल्याचे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलपेक्षा डिझेलवर जास्त तोटा होत आहे. डिझेल 3 ते 4 रुपयांनी तर पेट्रोल 2 ते 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या आजची किंमत

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com