Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या आजची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 110 डॉलर ओलांडूनही, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Priceesakal

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 110 डॉलर ओलांडूनही, तेल कंपन्यांनी आज 16 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर 7 एप्रिलपासून स्थिर आहेत. अशा स्थितीत महागाईने हैराण झालेल्या जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

Petrol-Diesel Price
Petrol Diesel Price: : सीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत

इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी, दररोज प्रमाणे, आज (सोमवार) 16 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अद्यतनित केले आहेत. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Petrol-Diesel Price
Petrol Diesel Price: : सीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com