Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या आजचे दर

तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Pricesesakal

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आज पुन्हा तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून तेलाच्या दरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे, तर त्यापूर्वी सुमारे दहा रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आहे, तर एक लिटर डिझेल 104.77 रुपयांना विकले जात आहे. कोलकाता येथे पेट्रोलचे दर 115.12 रुपयांवर स्थिर आहेत, तर डिझेल 99.83 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 100.94 रुपयांना उपलब्ध आहे.

Petrol Diesel Prices
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर:

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली 105.41/ 96.67

मुंबई 120.51/ 104.77

कोलकाता 115.12/ 99.83

चेन्नई 110.85/ 100.94

Petrol Diesel Prices
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com