Petrol Diesel Price: CNG महागला,पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत दिलासा; जाणून घ्या आजचे दर

आज सलग ४५ वा दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Priceesakal

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज सलग ४५ वा दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. अशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशाच्या राजधानीपासून ते देशातील अनेक शहरांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमती वाढल्या आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या किमती आज 21 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत.

Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजची किंमत

प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

मुंबई-

पेट्रोल - 120.51 रुपये प्रति लिटर

डिझेल - 104.77 रुपये प्रति लिटर

दिल्ली-

पेट्रोल - 105.41 रुपये प्रति लिटर

डिझेल - 96.67 रुपये प्रति लिटर

चेन्नई-

पेट्रोलची किंमत - 110.85 रुपये प्रति लिटर

डिझेलची किंमत -100.94 रुपये प्रति लिटर

कोलकाता-

पेट्रोलची किंमत - 115.12 रुपये प्रति लिटर

डिझेलची किंमत - 99.83 रुपये प्रति लिटर

Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे दर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com