तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजची किंमत

आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price esakal

Petrol Diesel Price Updates Today: तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Rate: तेल कंपन्यांकडून दिलासा; जाणून घ्या आजचे नवे दर

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 112 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली होती. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांनी सांगितले.

प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या-

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.

दिल्ली 89.62/ 96.72

मुंबई 97.28/ 111.35

कोलकाता 92.76/ 106.03

चेन्नई 94.24/ 102.63

Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com