Post Office Scheme: पोस्ट ऑफीसच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा, सुरक्षेसह मिळवा दुप्पट परतावा

या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. यामुळेच लोक बँकेत गुंतवणूक करण्याऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात.
Post Office Scheme
Post Office Schemesakal

पैसे बचतही करायचे आहेत, सुरक्षाही हवी आहे आणि चांगला परतावाही पाहिजे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीमबद्दल बोलत आहोत. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. यामुळेच लोक बँकेत गुंतवणूक करण्याऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. (Post Office Scheme invest money and earn double return )

पोस्ट ऑफिस स्कीम्स सुरक्षेसह अधिक चांगला परतावा देणार्‍या मानल्या जातात. त्यामुळे गुंतवणुकीबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला चक्रवाढीच्या अर्थात कंपाउंडिंगच्या आधारे व्याजाचा लाभ मिळतो.

Post Office Scheme
Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा

चक्रवाढ व्याजामुळे तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेद्वारे 10 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला या योजनेत लाँग टर्मसाठी पैसे जमा करावे लागतील. कारण चक्रवाढीचा फायदा लाँग टर्म गुंतवणुकीतच मिळतो. सध्या तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता.

एका वर्षाच्या कालावधीसाठी त्यावर 5.5 टक्के व्याजदर आहे. याशिवाय 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठीही 5.5 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. तर 5 वर्षांसाठी 6.7 टक्के व्याज मिळते. शिवाय आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या कालावधीसाठी बेनिफिट मिळते.

Post Office Scheme
Post office scheme : फक्त १०० रुपयांची गुंतवणूक करून मिळवा हजारोंचा परतावा

कोण सुरु करु शकतं अकाऊंट?
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये कोणताही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो. एवढेच नाही तर 3 प्रौढ व्यक्ती जॉईंट अकाऊंटही उघडू शकतात. पालक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावे टाइम डिपॉझिट खाते उघडू शकतात. 1,000 रुपये गुंतवूनही खाते उघडता येते.

डबल पैसे कसे होतील?
एखाद्याने 1 लाख रुपयांसह 5 वर्षांसाठी ही स्कीम घेतली तर त्यावर 6.7 टक्के वार्षिक व्याजदराने, 5 वर्षांनी ते 1,39,407 रुपये होतील. पण तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 129 महिने लागतील अर्थात जवळपास 10 वर्ष लागू शकतात.

Post Office Scheme
Post Office Scheme : १५०० रुपये गुंतवा आणि ३५ लाखांचा फायदा मिळवा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com