100 रुपयांची ताकद, निवृत्तीच्या 10 वर्षांआधीच व्हाल कोट्यधीश, कसे ? जाणून घ्या | Share News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power of 100 rupees You become a billionaire 10 years before retirement know-how

100 रुपयांची ताकद! निवृत्तीच्या 10 वर्षांआधीच व्हालं कोट्यधीश पण, कसं?

Mutual Fund SIP Investment: बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, म्युच्युअल फंड एसआयपीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालला आहे. डिसेंबर 2021 मध्ये एसआयपीचे आकडे पाहिले तर ते 11,305 कोटी रुपये झाले. लाँग टर्मसाठी एसआयपी चक्रवाढीचे मोठे फायदे आहेत. यामध्ये खास गोष्ट अशी आहे की तुम्ही 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता आणि नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड सहज तयार करता येतो.

कसे व्हाल कोट्यधीश ?

SIP Calculator: समजा तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षापासून दररोज 100 रुपये वाचवले तर तुमची बचत दरमहा 3,000 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 3,000 रुपयांची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही पुढील 30 वर्षे पूर्ण केल्यावरच म्हणजे 50 व्या वर्षी 1.1 कोटी रुपयांचा निधी तयार कराल. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक रु. 10.8 लाख असेल, पण तुम्हाला 95.1 लाख चक्रवाढ व्याज मिळेल. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा लाँग टर्मसाठी 12 टक्के CAGR वार्षिक परतावा असतो. लक्षात ठेवा की वार्षिक परतावा वाढला किंवा कमी झाला की तुमचा कॉर्पस वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. कारण म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरही बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होतो. पण, थेट इक्विटी गुंतवणुकीच्या तुलनेत ही जोखीम कमी आहे

हेही वाचा: TCS शेअरची पुनर्खरेदी ४५०० रुपयांमध्ये करणार

SIP मधील गुंतवणूकीत वाढ

AMFI ने जाहीर केलेल्या डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधील (SIP) एकूण गुंतवणूक 11,305 कोटी इतकी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये हाच आकडा 11,005 कोटी रुपये होता. SIP अकाउंट्सची संख्या नोव्हेंबर 2021 मध्ये 4.78 कोटींवरून गेल्या महिन्यात 4.91 कोटी झाली.

तज्ज्ञ काय म्हणतात?

पद्धतशीर किंवा शिस्तबद्ध गुंतवणूक लाँग टर्मसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचा विश्वास रिटेल गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे एडलवाईस म्युच्युअल फंडाचे प्रमुख (सेल्स) दीपक जैन म्हणाले. त्यामुळे नियमित गुंतवणुकीसाठी ते SIP ला प्राधान्य देत आहेत.

SIP ही गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत आहे. दीर्घ मुदतीसाठी असे अनेक फंड आहेत, ज्यांचा वार्षिक SIP परतावा 12 टक्के आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नसल्याचे बीपीएन फिनकॅपचे डायरेक्टर एके निगम म्हणाले.

हेही वाचा: सॉलिड फंडामेंटल्स असणारे 2 स्टॉक्स, तज्ज्ञांचे फेव्हरिट!

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Power
loading image
go to top