
झोमॅटोचे शेअर्स विक्रमी नीचांकी पातळीवर; गुंतवणूकदारांचे निम्मे पैसे बुडीत
Zomato चा स्टॉक पाच दिवसात जवळपास 12 टक्क्यांनी घसरून विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी हा शेअर 2.51 टक्क्यांनी घसरून 72 रुपयांवर बंद झाला. इंट्राडे दरम्यान, शेअरने 71.10 रुपयांच्या नीचांकी आणि 74.85 रुपयांच्या वरच्या पातळीला स्पर्श केला. 2022 बद्दल बोलायचे झाले तर, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ऑपरेट करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची जवळपास निम्मी रक्कम बुडवली आहे.
सीसीआयच्या रडारवर-
प्रतिस्पर्धा आयोगाच्या (CCI) आदेशानेही Zomato स्टॉकला मोठा धक्का बसला आहे. न्यू एज टेक शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारातील सेंटीमेंट्स खराब झाल्या. 4 एप्रिलला, आयोगाने रेस्टॉरंट पार्टनर्ससोबत व्यवहार करताना चुकीच्या व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल स्विगी आणि झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मच्या विरोधात विस्तृत चौकशीचे आदेश दिले होते.
हेही वाचा: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर्स करणार मालामाल; 36% वाढीचा तज्ज्ञांना विश्वास
कंपनी तपासात सहकार्य करण्यासाठी आयोगासोबत काम करेल आणि त्यांची कार्यपद्धती प्रतिस्पर्धा कायद्यांनुसार असल्याचे नियामकाला कळवेल असे Zomato ने स्पष्ट केल्याचे कळतंय.आयोगाच्या कोणत्याही शिफारसी लागू करण्यास तयार असल्याचे Zomato ने या महिन्याच्या सुरुवातीला एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले होते.
संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भागीदारीत घट-
मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Zomato कंपनीतील हिस्सा कमी केला आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी त्यांच्या 2.82 टक्के शेअर्सपैकी 8.3 कोटी इक्विटी शेअर्स अर्थात 1.1 टक्के भागीदारीची विक्री केली आहे.
हेही वाचा: 'या' मल्टीबॅगर स्टॉकने एका वर्षात दिला 400% परतावा
एफपीआयने कंपनीच्या 10.17 टक्के शेअर्सपैकी 6.8 कोटी शेअर्स अर्थात 0.9 टक्के हिस्सेदारी विक्री केली आहे. पण, झोमॅटोमधील लहान शेयरहोल्डर्सची होल्डिंग 2.07 टक्क्यांनी वाढून 9.07 टक्के झाली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Zomatos Stock Fell Nearly 12 Percent In Five Days To A Record Low
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..