बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टी सतत वाढत आहे, त्यासोबतच डेली अप्पर बोलिंजर बँडमध्येही वाढ दिसून येत असल्याचे बीएनपी परिबाचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले.
share market update
share market update esakal
Updated on

गुरुवारी सलग सहाव्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला. आयटी शेअर्सनी बाजाराला चांगला सपोर्ट केला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 214.17 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 58,350.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 42.70 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 17,388.15 वर बंद झाला. (pre analysis of share market 4 august 2022)

share market update
Share Market: शेअर बाजार सकारात्मक, सेन्सेक्स किंचित वाढला

परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारताकडे वळत असल्याने बाजारात पुन्हा तेजीत आल्याचे एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे एस. हरिहरन म्हणाले. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये, FPIs ने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये सुमारे $1 बिलियनची खरेदी केली.

यूएस फेडची धोरणे नरमाईची आणि कच्च्या तेलात नरमाईची चिन्हे दिल्यामुळे मॅक्रो वातावरण भारतासाठी चांगले ठरले. बाजाराने गेल्या आठवडय़ात उदयोन्मुख बाजार आणि इतर आशियाई बाजारांना 6 टक्क्यांनी मागे टाकले आहे.

share market update
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टी सतत वाढत आहे, त्यासोबतच डेली अप्पर बोलिंजर बँडमध्येही वाढ दिसून येत असल्याचे बीएनपी परिबाचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून बाजार स्थिर व्यवहार करत आहे. 17500 च्या टारगेटपासून तो आता अगदी थोड्या अंतरावर आहे. जर निफ्टी 17500 च्या पातळीवर पोहोचला, तर एकदा तो शॉर्ट टर्म कन्सोलिडेशन येऊ शकतो. आता निफ्टीसाठी नजीकचा टर्म सपोर्ट झोन 17150-17200 च्या जवळ दिसत आहे. गुरुवारी बुल्स आणि बियर्समध्ये जोरदार संघर्ष सुरू होता, पण शेवटी दलाल स्ट्रीटमध्ये बुल्सचे वर्चस्व दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

बाजाराला आयटी आणि निवडक आर्थिक शेअर्मध्ये खरेदीचा सपोर्ट मिळाला. पुन्हा एकदा एफआयआयचे पुनरागमन बाजारात दिसून येत आहे. निफ्टीने इंट्राडे चार्टवर डबल बॉटम आणि डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली जे पॉझिटिव्ह संकेत आहेत. ट्रेडर्सना आता 17200 आणि 17300 वर सपोर्ट दिसत आहे.

share market update
Campus Activewear Stock ला आउटपरफॉर्म रेटिंग, नवीन टारगेट किती ?

जोपर्यंत निफ्टी या सपोर्टच्या वर राहील तोपर्यंत तो 17500-17550 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ट्रेंड-फॉलोइंग पोझिशनल ट्रेडर्ससाठी 17200 वर सपोर्ट आहे. आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ? टेक महिन्द्रा (TECHM) इन्फोसिस (INFY) टायटन (TITAN) टीसीएस (TCS) एशियन पेन्ट्स (ASIANPAINT) पर्सिस्टंट (PERSISTENT) एम फॅसिस (MPHASIS) एमआरएफ (MRF) ट्रेंट (TRENT) लॉरस लॅब (LAURUSLABS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com