बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बॅकिंग स्टॉककडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे बाजाराला सुरुवातीचा नफा पुढे नेण्यात यश आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले
share market update
share market updategoogle

सोमवारी शेअर बाजार वाढीसह अर्थात बंद झाला. एफएमसीजी आणि फायनान्शियल शेअर्सकडून बाजाराला चांगला सपौर्ट मिळाला. सेन्सेक्स 326.84 अंकांच्या अर्थात 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 53,234.77 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 83.30 अंक म्हणजेच 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 15,835.35 वर बंद झाला.(pre analysis of share market 5 july 2022)

share market update
पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना !

बॅकिंग स्टॉककडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे बाजाराला सुरुवातीचा नफा पुढे नेण्यात यश आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बँकिंग सेक्टरचा प्रोव्हिजनल डेटा पहिल्या तिमाहीत क्रेडिट ग्रोथमध्ये मजबूती दिसल्याचे दाखवते. जसजसे तिमाही निकालाकडे वाटचाल करत आहोत, तसतसे बाजाराचे लक्ष आता कंपनीच्या निकालांवर आणि नवीन आर्थिक वर्षासाठी मॅनेजमेंटच्या गायडन्सवर असेल.

share market update
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?
ट्रेडिंग सत्राच्या दुसऱ्या भागात बाजाराने जोरदार कमबॅक केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. युरोपीय बाजारातील भावना सुधारणे, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, रुपयाची कमजोरी थांबल्याने बाजाराला साथ मिळाली. पण या रिकव्हरीनंतरही, मंदी आणि अस्थिर वातावरणाचे बाजारावर वर्चस्व असेल कारण FII ची विक्री सुरूच आहे ज्याचा गुंतवणूकदारांवर परिणाम होत आहे.

तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास, बर्‍याच काळानंतर, निफ्टी त्याच्या 20 दिवसांच्या SMA वर बंद झाला आहे आणि डेली चार्टवर लॉन्ग बुलिश कँडल मेणबत्तीही तयार केली आहे. आता जोपर्यंत निफ्टी 15700 च्या वर राहील तोपर्यंत ही तेजी कायम राहणे अपेक्षित आहे. पुढे निफ्टी 15950-16000 च्या पातळीला स्पर्श करताना पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 15700 च्या खाली घसरला तर ही घसरण 15650-15600 पर्यंत जाऊ शकते.

share market update
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
ब्रिटानिया (BRITANNIA)
आयटीसी (ITC)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ऍस्ट्रल (ASTRAL)
ट्रेंट (TRENT)
टाटा पॉवर (TATAPOWER)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com