बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टी सध्या साईडवेज ट्रेडमध्ये असल्याचे LKP सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले.
sensex
sensexgoogle
Updated on

गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती. व्यवहाराच्या शेवटी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 53,018.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 18.85 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 15,780.25 वर बंद झाला.

sensex
एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी घट, पण सर्वसामान्यांना दिलासा नाहीच!

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टी सध्या साईडवेज ट्रेडमध्ये असल्याचे LKP सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. यासाठी 15,700 वर सपोर्ट आणि 15,900 वर रझिस्टंस आहे. जर निफ्टीने वरच्या बाजूने 15,900 ची पातळी तोडली तर बाजारात शॉर्ट कव्हरिंग रॅली दिसू शकते आणि निफ्टी 16200 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, 15,700 चा सपोर्ट तुटला तर तो 15,500-15,400 च्या दिशेने जाताना दिसेल. याच रेंजमध्ये फ्रेस पुट रायटींग पाहायला मिळाली.

गुरुवारी बाजार नकारात्मक झोनमध्ये राहिला आणि शेवटी सपाट बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजाराचा कल कमजोर राहिला. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे.

sensex
Bharti Airtel च्या शेअर्समध्ये 34% वाढ अपेक्षित...

तांत्रिक दृष्टिकोनातून गेल्या 3 दिवसांपासून बाजाराची दिशा स्पष्टपणे दिसत आहे. निफ्टीला 15700 वर सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, 15,900 रझिस्टंसचे काम करु शकतो. बाजार आणखी घसरला तर निफ्टी 15,600-15,550 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. दुसरीकडे, निफ्टीमध्ये कोणत्याही नवीन वाढीसाठी, 15900 ची पातळी ओलांडणे गरजेचे आहे. निफ्टीने ताकदीने 15900 ची पातळी ओलांडली तर तो 16,000-16,050 ची पातळी पाहू शकतो.

sensex
Create Portfolio: तज्ज्ञांच्या सल्ल्यानं पोर्टफोलिओ करा तयार, मिळेल चांगला परतावा...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ऍक्सिस बँक (AXISBANK)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
डिवीस लॅब (DIVISLAB)
ब्रिटानिया (BRITANNIA)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
सिप्ला (CIPLA)
बीपीसीएल (BPCL)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
श्रीराम सिमेंट (SHREECEM)

sensex
घरबसल्या भरा एलआयसी प्रीमियम, कसा जाणून घ्या...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com