Share Market : आज कोणते टॉप 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीने डेली चार्टवर एक मोठी बुलिश कँडल तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.
share market update
share market update esakal

नोव्हेंबर एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात रेकॉर्ड क्लोझिंग झाली. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 762 अंकांनी वाढून 62273 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 217 अंकांवर वाढून 18484 च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी 346 अंकांनी वाढून 43075 वर बंद झाला. तर मिडकॅप 139 अंकांनी वाढून 31289 वर बंद झाला.

आयटी आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. एफएमसीजी, एनर्जी आणि बँकिंग इंडेक्स वाढीसह बंद झाले. मेटल, रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्येही वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 43 शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी आठ शेअर्स वाढले.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे गुरुवारी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा वेग वाढला. एफओएमसीकडून व्याजदर वाढ रोखण्याची चिन्हे दिल्यानंतर बाजाराला चालना मिळाली. चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स निफ्टी जोरदार वधारले. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि डॉलर निर्देशांकात झालेली नरमाई यामुळेही बाजारातील उत्साह वाढला.

share market update
Share Market : 'या' सरकारी कंपनीच्या शेअरने 11 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती केली दुप्पट

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीने डेली चार्टवर एक मोठी बुलिश कँडल तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.  शिवाय ते डेली आणि इंट्राडे चार्टवर हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन राखत आहे, जे सकारात्मक संकेत आहेत.

निफ्टीने 18450 चा रझिस्टंस पार केल्याचे शेअर खानचे गौरव रत्न पारखी म्हणाले. आता निफ्टी त्याच्या ऑल टाईम हायकडे अर्थात  18604 लेव्हलकडे जाताना दिसेल. ही पातळी आता निफ्टीसाठी मेक अँड ब्रेक लेव्हल बनली आहे. जर निफ्टीने ही पातळी ओलांडली, तर तो शॉर्ट टर्म आणि मिड टर्मच्या दृष्टीकोनातून तेजी दिसेल. निफ्टीला सर्वात जवळचा सपोर्ट 18400-18380 वर आहे.

share market update
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
बीपीसीएल (BPCL)
इन्फोसिस (INFY)
टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
एल अँड टी टेक सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
ज्युबिलंट फुड्स (JUBLFOOD)
ए यू बँक (AUBANK)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com