बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis Of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोमवारी बाजारात तेजी होती. चागंले जागतिक संकेत, जून तिमाहीचे चांगले निकाल आणि मजबूत वाहन विक्री आकड्यांमुळे बाजारातील सकारात्मक वातावरण होते. याशिवाय जुलै महिन्यातील मजबूत जीएसटी कलेक्शन आणि पीएमआयच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळेही बाजाराला सपोर्ट मिळाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 545.25 अंकांच्या म्हणजेच 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 58,115.50 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 181.80 अंकांच्या म्हणजेच 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 17,340.05 वर बंद झाला.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजार आज तेजीसह बंद, गुंतवणुकदार मालामाल

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

बाजार तेजीत आहे आणि बुल्स 17,000-17,500 च्या दिशेने सतत पुढे जाण्याचा विचार करत असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 17025 वर त्याच्या 200-DMA वर राहील तोपर्यंत तो तेजीत राहील. येत्या काळात, निफ्टीला 17000 वर मजबूत सपोर्ट दिसतो. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी पहिला रझिस्टंस 17500 वर दिसत आहे. जर निफ्टीने हा अडथळा पार केला तर तो 18000 ची पातळीवर जाऊ शकतो.

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

चांगले जागतिक संकेत, मजबूत ऑटो विक्रीचे आकडे यामुळे बाजारात चांगले वातावरण होत असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजाराच्या नजरा आता आरबीआयच्या धोरणावर असतील. FII च्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार खूश आहेत. निफ्टी 200 दिवसांच्या SMA वर आहेआणि इंट्राडेमध्ये हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन कायम आहे. आता बाजार ओव्हरबॉट झोनमध्ये दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात इंट्राडेमध्ये करेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Gold price : आज सोन्याचे दर स्थिर; एका ग्रॅमचा दर ५ हजार १४९ रुपये

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एसबीआय लाईफ (SBILIFE)
टाटा स्टील (TATASTEEL)
हिन्दाल्को (HINDALCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
कोल इंडिया (COALINDIA)
आयआरसीटीसी (IRCTC)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
एमफॅसिस (MPHASIS)

हेही वाचा: Campus Activewear Stock ला आउटपरफॉर्म रेटिंग, नवीन टारगेट किती ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Pre Analysis Of Share Market Update 8 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..