बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

यूएस चलनवाढीच्या आकडेवारी येण्याआधी, व्याजदरात वाढ होण्याची चिंता वाढली आहे.
Share
ShareSakal

मंगळवारी सलग भारतीय बाजारात घसरण पाहायला मिळाली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती बाजारावर कायम होती. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 567.98 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरून 55,107.34 वर बंद झाला. तोच निफ्टी 153.20 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी घसरून 16416.35 वर बंद झाला.

Share
पीएफचा व्याजदर घटला म्हणून काय झालं? या ५ योजना देतील उत्तम परतावा

व्याजदरात वाढ होण्याच्या चिंतेने मंगळवारी आशियाई बाजार संमिश्र होते असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. यूएस चलनवाढीच्या आकडेवारी येण्याआधी, व्याजदरात वाढ होण्याची चिंता वाढली आहे. या आठवड्यात युरोपियन सेंट्रल बँकेची बैठकही होणार आहे. दुसरीकडे, कच्चे तेल 120 डॉलरच्या वर आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात, सीपीआय चलनवाढीसह, बाजार अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवरही लक्ष असेल.

बाजारातील अस्थिरता RBI पॉलिसीआधी गुंतवणूकदारांना बाजारापासून दूर राहण्यास भाग पाडत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराने रेपो दर आणि CRR मध्ये 40-50 बेसिस पॉइंट्स वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, लिक्विडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलल्यास त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

Share
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

महागाईचा सामना करण्यासाठी आरबीआय दर वाढवताना दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजारात एफआयआयकडून सतत विक्रीचा दबाव आहे. कमकुवत होत असलेला रुपया आणि मजबूत डॉलरमध्ये विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजार सोडताना दिसत आहेत.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास, निफ्टीने मंगळवारी 16450 चा मोठा सपोर्ट तोडला आणि त्याच्या खाली बंद झाला, जे नेगिटीव्ह संकेत आहे. इंडेक्सने बियरिश कँडल तयार केली आहे जी येत्या काळात बाजारातील कमजोरीचे लक्षण आहे.

जोपर्यंत निफ्टी 16500 च्या खाली राहील तोपर्यंत त्याचा शॉर्ट टर्म ट्रेंड कमजोर राहील आणि ही कमजोरी 16300 कडे जाताना दिसेल. निफ्टी जर आणखी घसरला तर तो 16225 पर्यंत जाईल. दुसरीकडे, जर निफ्टी 16500 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर तो 16600-16650 पर्यंत जाऊ शकतो.

Share
Penny Stockचा 5 महिन्यात 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; पण तज्ज्ञ काय सांगतात

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

टाटा पॉवर (TATAPOWER)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

ओएनजीसी (ONGC)

एनटीपीसी लिमिटेड (NTPC)

कोल इंडिया (COALINDIA)

मारुी (MARUTI)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com