Gold Rate: सोन्याचे दर घसरले, चांदीतही घट; जाणून घ्या आजचे दर

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 22 October 2020

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमुळे जागतिक सोने बाजारपेठेत मोठी अस्थिरता दिसत आहे.

नवी दिल्ली: अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमुळे जागतिक सोने बाजारपेठेत मोठी अस्थिरता दिसत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत आज रुपया मजबूत झाल्याचे दिसले आहे. याचाच परिणाम म्हणजे आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आज भारतीय बाजारपेठेत सोन्याचा भाव 95 रुपयांनी घसरून 51 हजार 405 रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचे भाव 504 रुपयांनी घसरूण 63 हजार 425 रुपये प्रति किलो झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर घसरुण 1918 डॉलर प्रति औंस झाले आहेत तर चांदीचे भाव 24.89 डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 95 रुपयांनी कमी झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमॉडिटीज) तपन पटेल यांनी दिली आहे.

धातू शुध्दता(कॅरेट)  प्रति 10 ग्रॅमच्या किंमती
सोने 24 51350
सोने 23  51144 
सोने 22 47037
सोने 18 38513
सोने 14 30040 
चांदी 999 62779 रु. किलो

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

बुधवारी सोने-चांदी भाव वधारले होते-
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्यासह इतर मौल्यवान धातूच्या किंमतीत बुधवारी वाढ झाली होती. सोन्याचा भाव 512 रुपयांनी वाढून 10 ग्रॅमला 51 हजार 415 रुपये आणि चांदी प्रति किलो 1448 रुपयांनी वाढून 64 हजार 15 रुपयांपर्यंत गेली होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1921 डॉलरवर तर चांदी किंचित वाढून 25.10 डॉलर प्रति औंसवर गेली होती. 

डॉलरच्या तुलनेत रुपयात चार पैशांची वाढ-
परदेशी निधीतून सातत्याने होणाऱ्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारामध्ये उत्साह दिसत आहे. गुरुवारी स्थानिक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया प्रति डॉलर 73.54 वर बंद झाला.  

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम

आंतरबँक परकीय चलन बाजारातील व्यवहारात रुपया प्रति डॉलर 73.77 रुपयांवर बंद झाला, पण त्याचा होणारा तोटा रोखण्यात आला आहे. व्यवहाराच्या शेवटी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर प्रति डॉलर 73.54 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये चढउतार दर्शवणारा डॉलर निर्देशांक 0.13 टक्क्यांनी वाढून 92.73 वर पोहोचला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prices of silver and gold slumps in India