IPO News : मालामाल होण्याची सुवर्ण संधी! लवकरच येणार ‘या’ कंपनीचा IPO; सेबीमध्ये कागदपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

IPO News : मालामाल होण्याची सुवर्ण संधी! लवकरच येणार ‘या’ कंपनीचा IPO; सेबीमध्ये कागदपत्र दाखल

Share Market IPO Listing : इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजीचे प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूट करणारी राशी पेरिफेरल्स (Rashi Peripherals) ही कंपनी आपला आयपीओ आणणार आहे.

कंपनीने यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. कंपनीला या आयपीओद्वारे 750 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओअंतर्गत, पूर्णपणे नवीन शेअर्स जारी केले जातील.

राशी पेरिफेरल्स इक्विटी शेअर्सच्या खासगी प्लेसमेंटद्वारे 150 कोटी रुपयांपर्यंत उभारण्याचा विचार करू शकते.

कंपनी या आयपीओअंतर्गत मिळालेल्या निधीतून 400 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरेल. याशिवाय, 200 कोटी रुपये सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी वापरले जातील.

कंपनीने प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये निधी उभारल्यास, नवीन इश्यूचा आकार कमी केला जाईल. सप्टेंबर 2022 पर्यंत, कंपनीवर 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.

मार्च FY22 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात राशी पेरिफेरल्सने कंसोलिडेटेड नफ्यात 34 टक्के वाढ नोंदवली असून तो 182.5 कोटी झाला आहे.

हेही वाचा: Budget 2023 : पुन्हा महागाई वाढणार? तब्बल 35 वस्तुंवरील कस्टम ड्युटीत होऊ शकते वाढ

त्याच वेळी, ऑपरेशन्समधील रेव्हेन्यू 57.2 टक्क्यांनी वाढून 9,313.4 कोटी रुपये झाला आहे. FY23 सप्टेंबर रोजी संपलेल्या 6 महिन्यांत नफा 67.37 कोटी आणि महसूल 5,023.8 कोटी होता.

कृष्ण कुमार चौधरी आणि सुरेशकुमार पानसारी यांनी 1989 मध्ये कंपनीची स्थापना केली होती. पर्सनल कॉम्प्युटिंग, एंटरप्राइझ आणि क्लाउड सोल्युशन्स (PES) वर्टिकल अंतर्गत, कंपनी पर्सनल कंप्यूटिंग, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, एम्बेडेड डिझाइन आणि उत्पादने आणि क्लाउड कंप्यूटिंग डिस्ट्रिब्यूट करते.

हेही वाचा : Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं?

दुसरे वर्टिकल म्हणजे लाइफस्टाइल आणि आयटी इसेन्शियल, ज्या अंतर्गत ते ग्राफिक्स कार्ड्स, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स आणि मदरबोर्ड, स्टोरेज आणि मेमरी डिव्हायसेस, लाइफस्टाइल पेरिफेरल आणि एक्सेसरीज, पॉवर एक्सेसरीज आणि नेटवर्किंग आणि मोबिलिटी डिव्हाइसेस डिस्ट्रिब्यूट करते. जेएम फायनान्शियल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज ऑफरचे लीड मॅनेजर आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.