रतन टाटांचे आत्मचरित्र लवकरच; प्रकाशन अधिकार ‘हार्पर कॉलिन्स’ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

२०१८ साली मॅथ्यू यांनी चरित्रलेखनाला सुरुवात केली होती. जागतिक स्तरावर या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती प्रकाशन संस्थेने दिली आहे.

रतन टाटांचे आत्मचरित्र लवकरच; प्रकाशन अधिकार ‘हार्पर कॉलिन्स’ला

मुंबई - टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचे जीवनचरित्र नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित होणार आहे. प्रकाशनाचे हक्क ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशन संस्थेला मिळाले आहे. निवृत्त सनदी अधिकारी थॉमस मॅथ्यू यांनी ‘रतन टाटा : द ऑथोराईज्ड बायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. २०१८ साली मॅथ्यू यांनी चरित्रलेखनाला सुरुवात केली होती. जागतिक स्तरावर या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती प्रकाशन संस्थेने दिली आहे.

‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ने ‘लॅबिरिन्थ लिटररी एजन्सी’च्या अनिश चंडी यांच्याकडून या पुस्तकाचे हक्क मिळविले आहेत. टाटांचे आत्मचरित्र अमेरिका, ब्रिटन आणि भारतात इंग्रजीत आणि अन्य भारतीय भाषांत प्रकाशित होईल, असे ‘हार्पर कॉलिन्स’कडून सांगण्यात आले आहे.

टाटांचे आत्मचरित्र लिहिण्याच्या निमित्ताने एकूणच भारतीय ‘कॉर्पोरेट इकोसिस्टम’ जवळून पाहण्याची, त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. गेल्या चार दशकांत मिळाली, असे पुस्तकाचे लेखक थॉमस म्यॅथू यांनी सांगितले. संशोधनाचा एक भाग म्हणून मला टाटा उद्योगसमूहाच्या नोंदी अभ्यासासाठी मुक्तपणे उपलब्ध झाल्या. ट्रस्टची कागदपत्रे, रतन टाटा यांची वैयक्तिक कागदपत्रे, पत्रे आणि जर्नल्सचा अभ्यास करता आला. टाटा यांच्या जीवनगाथेचा मागोवा घेत मी अनेक खंडांत जाऊन पोहोचलो. त्यांच्याशी निगडित प्रभाव पाडणाऱ्या सर्व व्यक्तींच्या मुलाखती घेतल्याचे मॅथ्यू यांनी सांगितले.

हेही वाचा: अब्जाधीश रतन टाटांनी छोटासा केक कापून साधेपणाने साजरा केला 'वाढदिवस'

टाटा उद्योगसमूह
अत्यंत खडतर स्थितीवर मात करीत रतन टाटा यांनी उद्योग समूहाला जागतिक स्तरावर मजबूत उभे केले. टेटले चहा, जग्वार, लँडरोव्हर, कोरस स्टील, इत्यादीसारखे जगद्विख्यात ब्रान्ड त्यांनी टाटाच्या अधिपत्याखाली आणले. आजमितीला, टाटा समूह हा भारतातील सर्वाधिक मूल्यवान आणि जागतिक स्तरावर मान्यवर ब्रांड आहे. २५० अब्ज डॉलरचे बाजार भांडवल आणि ७,५०००० कर्मचारी असलेला हा उद्योगसमूह जगभरात १०० देशांमध्ये गाड्या, चहा, सॉफ्टवेअरसह विविध उत्पादनांची निर्मिती करतो.

रतन टाटा यांचे अधिकृत चरित्र प्रकाशित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. ज्या व्यक्तीच्या शब्दांनी आणि कृतींनी सभोवतालचे जग पालटले, अशा एका प्रेरणादायी, प्रभावी आणि परिवर्तनीय व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित असे हे उल्लेखनीय पुस्तक आहे.
- अनंत पद्मनाभन, सीईओ, हार्पर कॉलिन्स इंडिया.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ratan tata
loading image
go to top