

मालमत्ता विक्री आणि फसवणुकीबाबतीत सूचना देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी युनियन बँक ऑफ इंडियाला (UBI) एक कोटीचा दंड ठोठावला आहे. कर्जबुडव्या मालमत्तेची विक्री आणि फसवणुकीच्या केस दाखल करण्याबाबत आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन युनियन बँक ऑफ इंडियाने केले नाही, त्यामुळे हा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने युनियन बँकेच्या 2019 च्या आर्थिक स्थितीची चौकशी सुरू केली होती, ज्यामध्ये बँकेने काही नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. एका अकाऊंटचे रेड फ्लॅग म्हणून वर्गीकरण करणे आणि वार्षिक अहवालात सुरक्षितता पावत्या (Security Receipts) उघड करण्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केले गेले आहे असे आरबीआयच्या निवेदनात म्हटले आहे.
युनियन बँकेवरील ही कारवाई नियामकाने जारी केलेल्या नियमांच्या पालनाशी संबंधित आहे आणि युनियन बँकेच्या कोणत्याही व्यवहाराशी किंवा कराराशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे आरबीआयने सांगितले. युनियन बँकेचे आपल्या ग्राहकांशी व्यवहार आधीप्रमाणेच सुरू राहतील असेही आरबीआय म्हणाली.
आरबीआयने यापूर्वी युनियन बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का भरू नये, अशी विचारणा केली होती. बँकेच्या उत्तराचा विचार केल्यानंतर आरबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटीचा दंड ठोठावला.
दुसरीकडे, सोमवारी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स NSE वर 1.60 टक्के घसरून 43 रुपयांवर बंद झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.