RBI Monetary Policy : आरबीआयच्या रेपो दरात वाढ; याचा सामान्यांवर कसा होणार परिणाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI Policy

RBI Monetary Policy : आरबीआयच्या रेपो दरात वाढ; याचा सामान्यांवर कसा होणार परिणाम?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) दोन दिवसांच्या बैठकीनंतर आज तिसऱ्या दिवशी, RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बँक नेहमी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट वाढवते म्हणजे नक्की काय करते? त्याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो? आज आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ आणि महत्त्व सांगणार आहोत.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

रेपो रेट :

दैनंदिन व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. त्यातून बँकांची आर्थिक गरज पूर्ण होते. आरबीआय अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारते त्याला रेपो रेट म्हणतात.

रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जाचे दर वाढतात. त्यामुळे बँकांकडून अनेक प्रकारची कर्जे स्वस्त किंवा महाग होतात. जसे गृहकर्ज, वाहन कर्ज इ.

हेही वाचा: Monetary Policy : आरबीआयकडून रेपो दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या कर्जावर काय होणार परिणाम?

रिव्हर्स रेपो रेट :

रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेट दराच्या उलट आहे. बँकांकडे दिवसाच्या शेवटी मोठी रक्कम शिल्लक राहत असते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेटचा वापर बाजारातील रोख रकमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. जेव्हा जेव्हा बाजारात जास्त रोकड असते तेव्हा RBI रिव्हर्स रेपो रेट वाढवते, जेणेकरून बँका अधिक व्याज मिळवण्यासाठी त्यांचे पैसे आरबीआयकडे ठेवतात.